Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

पीएम किसान अंतर्गत पुढचा हप्ता या तारखेला मिळणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर 2020 ला दुपारी 12 वाजता दूर दृष्य प्रणाली द्वारे,  प्रधान मंत्री किसान सन्मान निधी (पीएम–किसान) अंतर्गत वित्तीय लाभाचा पुढचा हप्ता जारी करणार आहेत. पंतप्रधानांनी बटन दाबल्यानंतर 9 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबाना 18,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी हस्तांतरित होईल.

या कार्यक्रमादरम्यान  सहा राज्यातल्या शेतकऱ्यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत. पीएम-किसान आणि शेतकरी कल्याणासाठीच्या सरकारच्या विविध  उपक्रमाबाबत शेतकरी आपले अनुभव  कथन करतील.केंद्रीय कृषी मंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

पीएम किसानयोजने बाबत

पीएम किसान योजने अंतर्गत, पात्र लाभार्थी शेतकऱ्याला वर्षाला 6000 रुपयांचा निधी दिला जातो. 2000 रुपयांच्या तीन हप्त्यात दर चार महिन्यांनी ही रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.

योजनेचा लाभ कसा घ्यावा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत.
1. आधार कार्ड
2. अद्ययावत केलेले बॅँक खाते
3. पासपोर्ट आकाराचे फोटो
4. रहिवासाचा पत्ता सांगणारे कागदपत्र
5. जमिनीची कागदपत्रे

सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ संकेतस्थळावर जाऊन उजव्या बाजूला दिलेल्या रकान्यावर क्लिक करून माहिती भरा. या संकेतस्थळावरील मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करूनही ही माहिती भरता येईल.

पी.एम.किसान योजना

खालील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत

1.सर्व संस्थात्मक जमीनधारक
2.खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीशी संबंधीत शेतकरी कुटूंब
i) संवैधानिक पद धारण करणारे/ केलेले आजी व माजी व्यक्ती.
ii) आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/ माजी खासदार/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परीषद सदस्य, आजी/माजी महानगरपालीकेचे महापौर, आजी/माजी जिल्हा परीषदेचे अध्यक्ष.
iii) केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी/ कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमीत अधिकारी/कर्मचारी.
चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून
vi)सर्व निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रू. १०,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त आहे
चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून
v) मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती.
vi) नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (C.A), वास्तुशास्त्रज्ञ, इ. क्षेत्रातील व्यक्ती.

Exit mobile version