ही काश्मीर नव्हे, तर राज्यातील थंड हवेचे ठिकाण॥

पाकिस्तानपासून उत्तर भारतापर्यंत असलेला चक्रीय चक्रवात आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे पाचगणी व परिसरात ऐन हिवाळ्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. हवामान बदलामुळे ढग पाचगणीच्या निसर्गात एकरूप झाल्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना आणि स्थानिकांना भूरळ घालत आहे.

पाचगणी शहर व परिसरावर ढगांचे लोट स्वार होऊन पसरल्याने रविवारी सकाळच्या सुमारास जम्मू-काश्मीरसारखा नजारा पाहायला मिळत आहे. हवामान विभागाकडून राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर-पाचगणी येथे आज पहाटे हलक्या स्वरूपात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवामानात बदल झाला आहे. सोमवारपासून पर्यटन स्थळ बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने स्थानिक व्यवसायिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.