Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

चक्रीवादळानंतर रत्नागिरी जिल्ह्यात पंचनाम्याचे काम सुरू

रत्नागिरी दि. 17 : तोक्ते चक्रीवादळानंतर रत्नागिरी  जिल्ह्यात पंचनाम्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यात सरासरी 132.11  मिमी तर एकूण 1189  मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.   मंडणगड 52 मिमी , दापोली 82 मिमी, खेड 49 मिमी, गुहागर 120 मिमी, चिपळूण 100 मिमी, संगमेश्वर 142 मिमी, रत्नागिरी 274 मिमी, राजापूर 208 मिमी, लांजा  तालुक्यामध्ये 162 पावसाची नोंद झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी यांचेकडून तोक्ते चक्रीवादळाच्या झालेल्या नुकसानीबाबतची  प्राथमिक माहिती (12 वाजेपर्यंत) पुढीलप्रमाणे आहे.

मंडणगड तालुक्यात 200 घरांचे, दापोली तालुक्यात 350 घरे, खेड तालुक्यात 30 घरांचे, गुहागर 05 घरे, चिपळूण 65 घरे, संगमेश्वर 102 घरे, रत्नागिरी 200 घरे, राजापूर 32 असे एकूण जिल्ह्यात 1028 घरांचे तर रत्नागिरीमध्ये 1, लांजामध्ये 1 आणि राजापूरमध्ये 05 असे एकूण 07 गोठ्यांचे नुकसान झाले आहे.  या चक्रीवादळामध्ये गुहागर येथे 1,  संगमेश्वर येथे 1, रत्नागिरीमध्ये 03 आणि राजापूरमध्ये 03 असे एकूण 08 व्यक्ती जखमी झाल्या असून गुहागरमध्ये 1 बैल, संगमेश्वर मध्ये 01 बैल आणि रत्नागिरीमध्ये 2 शेळ्या असे 4 पशुधन मृत झाले आहेत.  जिल्ह्यामध्ये 450 झाडांची पडझड झाली असून 14 दुकाने व टपऱ्यांचे 09 शाळांचे तर 21 शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे.

वादळामुळे राजापूर तालुक्यात 652 व्यक्ती, रत्नागिरी तालुका 363, दापोली तालुका 2373, मंडणगड तालुका 508, गुहागर तालुका 667 असे एकूण 4563 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले.  सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार कोणत्याही मच्छिमार बोटी समुद्रात गेलेल्या नाहीत सर्व बोटी किनाऱ्यावर आहेत.

सदरचा अंदाज हा प्राथमिक स्वरुपाचा असून 17 मे 2021 रोजी पासून संबंधित तहसिलदारांमार्फत प्रत्यक्ष पंचानाम्याला सुरुवात करण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Exit mobile version