Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या 88.13 लाखापेक्षा जास्त मात्रा

देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत देशात काल 16 ऑगस्ट 2021 रोजी सुमारे 88 लाखाहून अधिक (88,13,919) मात्रा, पात्र नागरिकांना देण्यात आल्या.

लसीकरणाचा सध्याचा टप्पा जाहीर करताना 7 जून 2021 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पात्र नागरिकांना लस घेण्याचे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. कोविड-19 महामारीविरोधातल्या लढ्यात जनतेच्या भारत सरकारवरच्या विश्वासाची प्रचीतीच आजच्या कामगिरीवरून येत आहे. देशव्यापी लसीकरण अभियानाचा देशभरात वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.

लसींची अधिक उपलब्धता, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करण्याच्या दृष्टीने लस उपलब्धतेवर 15 दिवस आधीच दृष्टीक्षेप आणि प्रवाही लस पुरवठा साखळी याद्वारे लसीकरण अभियानाला अधिक गती देण्यात आली आहे.

88.13 लाख मात्रा दिल्याने एकूण लसीकरण 55.47 कोटी (55,47,30,609) झाले आहे. प्रौढ भारतीयांपैकी 46% जणांना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा तर 13% प्रौढांना लसीच्या दोन्ही मात्रा प्राप्त झाल्या असून कोविड-19 पासून संरक्षण मिळाले आहे.

Exit mobile version