गेल्या 24तासात 3 लाखांहून अधिक रूग्ण बरे

देशभरात आज  29.16 कोटींहून अधिक कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. आजच्या तारखेपर्यंत एकूण 29,16,47,037 चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 1,62,93,003 रूग्ण कोविडमुक्त झाले.

रुग्ण बरे होण्याचा  राष्ट्रीय  दर 81.77% असून  गेल्या  24  तासांत 3,00,732  रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे.

बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 73.49% रूग्ण हे दहा राज्यांमधील आहेत.

भारतातील  सक्रीय रुग्णांचा आलेख पुढे दिला आहे, दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 21.19% इतका आहे.

गेल्या 24 तासात 3,68,147  नव्या रुग्णांची नोंद झाली.

 

नव्या रुग्णांपैकी 73.78 % एकूण सक्रीय रुग्ण हे  महाराष्ट्र,कर्नाटक,केरळ,उत्तरप्रदेश,

दिल्ली,तामिळनाडू,पश्चिम बंगाल,आंध्रप्रदेश,राजस्थान  आणि बिहार या दहा राज्यांमधील आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 56,647 रुग्णांची नोंद झाली. त्या खालोखाल कर्नाटक 37,733 आणि केरळमध्ये 31,959 नव्या रुग्णांची नोंद झाली.

आज देशभरातील उपचाराधीन सक्रीय  रुग्णांची एकूण  संख्या 34,13,642 वर पोहोचली आहे. ही देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 17.13% इतकी  आहे. गेल्या 24 तासांत यामधे  63,998 अधिक सक्रीय रूग्णांची भर पडल्याची नोंद झाली.

नव्या रुग्णांपैकी 81.46% एकूण सक्रीय  रुग्ण महाराष्ट्र,कर्नाटक,उत्तरप्रदेश,केरळ,राजस्थान,गुजरात,आंध्रप्रदेश,छत्तिसगड,तामिळनाडू,पश्चिम बंगाल, बिहार  आणि  हरीयाना

या बारा राज्यांमध्ये आहेत.

राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत असून हा दर सध्या 1.10 टक्के आहे आणि तो सातत्याने खाली येत आहे

देशात गेल्या 24 तासात 3,417 रुग्णांचा मृत्यू झाला

यापैकी 74.54 टक्के मृत्यू दहा राज्यात झाले आहेत. दैनंदिन होणाऱ्या मृत्यूपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक (669) जणांचा मृत्यू झाला,त्या खालोखाल दिल्लीत (407),तर उत्तरप्रदेशात 288  मृत्यू झाले.

तीन  राज्ये / केंद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासात कोविड -19 मुळे एकही मृत्यू झालेला नाही