भारतातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी 67.16% रूग्ण पाच राज्यांत

भारतातील एकूण  सक्रीय रुग्णांपैकी  67.16% रूग्ण पाच राज्यांत

देशभरात कोविड -19 च्या लसींचा एकूण 11.44 कोटी मात्रांचा टप्पा पार झाला आहे.  सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील लसीकरणाला चालना  देण्यासाठी, दिनांक 11 ते 14 एप्रिल 2021 या चार दिवसांच्या कालावधीत, देशभरात लसीकरण उत्सव(टीका उत्सव) साजरा करण्यात आला. या लसीकरण उत्सवाच्या  कालावधीत,एकूण लसीकरणाच्या आकडेवारीनुसार 1,28,98,314 पात्र  लोकसंख्येच्या समूहांना लसींच्या मात्रा  देऊन लसीकरणाने  मोठी झेप  घेतली आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकूण 16,98,138 सत्रांद्वारे  11,44,93,238  लसींच्या मात्रा   देण्यात आले.यापैकी 90,64,527 आरोग्य कर्मचाऱ्यांना(HCW) पहिली मात्रा,  56,04,197 आरोग्य कर्मचाऱ्यांना (HCW) दुसरी मात्रा, 1,02,13,563, आघाडीच्या कर्मचाऱ्यांना (FLW) पहिली  मात्रा, 50,64,862 कर्मचाऱ्यांना (FLW) दुसरी मात्रा, वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या  4,34,71,031 लाभार्थ्यांना पहिली  मात्रा,तर 27,47,0192 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा, तसेच 45 ते 60 वर्षे वयोगटातील 3,74,30,078  लाभार्थ्यांना पहिली  मात्रा तर 8,97,961 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा,देण्यात आली .

HCWs FLWs Age Group 45-60 years Over 60 years  

Total

1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose
90,64,527 56,04,197 1,02,13,563 50,64,862 3,74,30,078 8,97,961 4,34,71,031 27,47,019 11,44,93,238

देशभरात आतापर्यंत दिलेल्या मात्रांपैकी 59.76% मात्रा  आठ राज्यांत दिल्या  आहेत.

खालील आलेख आठ राज्यांतील लसीकरणाची विवक्षित आकडेवारी दाखवत आहे.

गेल्या 24  तासांत लसींच्या  एकूण 33 लाख मात्रा  देण्यात आल्या .

काल दिनांक  14 एप्रिल 2021या लसीकरणाच्या 89 व्या दिवशी 33,13,848 लसींच्या मात्रा  देण्यात आल्या . त्यात 44,864, सत्रांतून  28,77,473, लाभार्थ्यांना  पहिली मात्रा देण्यात आली तर 4,36,375 लाभार्थ्यांना  दुसरी मात्रा  देण्यात आली.

Date: 14th April,2021 (Day-89)
HCWs FLWs 45 to <60 years Over 60 years Total Achievement
1stDose 2ndDose 1stDose 2nd Dose 1stDose 2nd Dose 1stDose 2nd Dose 1stDose 2ndDose
15,841 23,125 77,321 54,089 17,79,634 79,626 10,04,677 2,79,535 28,77,473 4,36,375

भारतातील  दैनंदिन  नवीन रुग्णसंख्येत  सतत भर पडत आहे.गेल्या 24 तासांत 2,00,739 नव्या रुग्णांची नोंद झाली.

महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, मध्यप्रदेश, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यांतील दररोजच्या बाधित  रुग्णसंख्येत अधिक वाढ होताना दिसत आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी 80.76% रूग्ण या 10 राज्यांत आहेत.

महाराष्ट्राच्या   दैनंदिन बाधित रुग्णांत,  सर्वाधिक 58,952  नव्या रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल उत्तरप्रदेशमधे 20,439 तर दिल्लीत 17,282, नव्या रूग्णांची नोंद झाली.

खालील आलेख सोळा राज्यांत  रुग्णसंख्येचा वाढत जाणारा कल  दर्शवित आहे.

भारतातील सक्रीय रूग्णसंख्या आता 14,71,877 वर पोचली आहे.एकूण बाधित  रुग्णांपैकी 10.46% रूग्ण सक्रीय आहेत. गेल्या 24 तासांत, बाधित रूग्णसंख्येत 1,06,173  सक्रीय रुग्णांची भर पडल्याची नोंद झाली. महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या पाच राज्यांत भारतातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी 67.16% सक्रीय रुग्ण आहेत. देशातील एकूण सक्रीय  रुग्णांपैकी 43.54% रूग्ण केवळ महाराष्ट्रात आहेत .

भारतातील बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या 1,24,29,564 इतकी आहे. देशाचा बरे होण्याचा राष्ट्रीय सरासरी दर 88.31%आहे.

गेल्या 24 तासांत 93,528 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत 1,038 मृत्यूंची नोंद झाली.

म्रुत्यु झालेल्यांपैकी 82.27% मृत्यु दहा राज्यांत झाले आहेत.महाराष्ट्रात सर्वाधिक (278) म्रुत्यूंची नोंद झाली. त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये 120 मृत्यूंची नोंद झाली.

नऊ राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांत, गेल्या 24 तासांत कोविड-19मुळे एकाही म्रुत्यूची नोंद झाली नाही.यात दीव आणि दमण,दादरा आणि नगरहवेली, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम, नागालँड, मिझोराम,मणीपूर,लक्षद्वीप आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.