Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

सेंद्रीय शेतीवर राज्‍यस्‍तरीय ऑनलाईन प्रशिक्षण

देशातील नामांकित तज्ञ करणार मार्गदर्शन, रोज सायंकाळी ७.०० वाजता ऑनलाईन मार्गदर्शन 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुशक्‍तीचा योग्‍य वापर प्रकल्‍प आणि मुंबई येथील फार्म दु फोर्क सोल्‍युशन्‍य यांचे संयुक्‍त विद्यमाने दिनांक २१ सप्‍टेबर ते ९ ऑक्‍टोबर दरम्‍यान सेंद्रीय शेती यावर पंधरा दिवसीय राज्‍यस्‍तरीय प्रशिक्षणाचे ऑनलाईन वेबीनार मालिकेच्‍या माध्‍यमातुन आयोजन करण्‍यात आले आहे. प्रशिक्षणाचे उदघाटन दिनांक २१ सप्‍टेबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता राज्‍याचे माननीय कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे यांच्‍या हस्‍ते ऑनलाईन पध्‍दतीने होणार असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण राहणार आहेत.

विशेष अतिथी म्‍हणुन  गुजरात येथील आनंद कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ आर व्‍ही व्‍यास हे उपस्थित राहणार असुन विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, नागपुर येथील क्षेत्रीय जैविक शेती केंद्राचे क्षेत्रीय संचालक डॉ ध्रुवेंद्र कुमार, भारत सरकारच्‍या कृषि व शेतकरी कल्‍याण मंत्रालयातील सल्‍लागार डॉ ए के यादव, कृषि आयुक्‍तालयातील कृषि संचालक श्री दिलीप झेंडे, प्रगतशील शेतकरी श्री सोपानराव अवचार आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सदरील प्रशिक्षणात सेंद्रीय पीक लागवड तंत्रज्ञान, सेंद्रीय शेतीमध्‍ये अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, कीड व रोग व्‍यवस्‍थापन, अवजारांचा कार्यक्षम वापर, सौर ऊर्जा व इतर अपारंपारिक साधनांचा वापर, निविष्‍ठांची निर्मिती व वापर, विक्री व बाजारपेठ तंत्रज्ञान, सेंद्रीय प्रमाणीकरण आदी विविध विषयांवर राज्‍यातील व देशातील नामांकित कृषि विद्यापीठे, संशोधन संस्‍था, स्‍वयंसेवी संस्‍थेतील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

सदरिल प्रशिक्षणात शेतकरी बंधु भगिनी, कृषि विज्ञान केद्राचे विषय विशेषज्ञ, कृषि शास्‍त्रज्ञ, कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्‍वयंसेवी संस्‍थाचे सदस्‍य, विद्यार्थी आदींनी जास्‍तीत जास्‍त संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन आयोजन प्रमुख अन्‍वेषक डॉ आनंद गोरे, संशोधन अभियंता डॉ स्मिता सोलंकी, फार्म टु फोर्क सोल्‍युशन्‍सचे संचालक श्री उमेश कांबळे यांनी केले आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्‍वयक डॉ रणजित चव्‍हाण, डॉ अनुराधा लाड, डॉ पपिता गौरखेडे, श्री अभिजीत कदम हे आहेत. कार्यक्रमात सहभाग नोंदवण्‍यासाठी  https://forms.gle/E55kzXUEdDfRHbPg6  येथे करून ऑनलाईन फोर्म भरावा. आजपर्यंत दिड हजार पेक्षा जास्त जणांनी नोंदणी केली असुन  प्रशिक्षण यशस्‍वीरित्‍या पुर्ण करणा-यांना डिजिटल प्रमाणपत्राचे वितरित करण्‍यात येईल. सहभागी होण्‍याकरिता झुम मिंटिंग आय डी ९९५ ६३१४ ८२४१ व पासवर्ड १२३४५ वापर करावा. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाचे युटयुब चॅनेल youtube.com/user/vnmkv यावर होणार आहे.

Exit mobile version