शेवगा उत्पादकांना संधी; शेवगा पावडर निर्यातीला प्रारंभ

भारताने शेवग्याच्या पावडरीतील पौष्टिक गुणधर्मांमुळे वाढत असलेली जागतिक मागणी लक्षात घेऊन त्याच्या निर्यातीचा केला आरंभ

भारतातून शेवग्याची पावडर (वनस्पती शास्त्रीय नाव : botoringa oleifera) निर्यात करण्याला चालना देण्यासाठी अपेडा (APEDA) खाजगी संस्थांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध तयार करण्यास सहाय्य करत आहे. दिनांक 29 डिसेंबर 2020 रोजी 2 टन प्रमाणित सेंद्रिय शेवग्याची पावडर विमानाने अमेरिकेला पाठविण्यात आली. या कार्यक्रमास भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सचिव डॉ. एम.अंगमुथू यांनी हिरवा झेंडा दाखविला.

तेलंगणा येथील एक अपेडा नोंदणीकृत निर्यातदार मेसर्स मेडिकोंडा न्यूट्रीयंटस यांना नियोजनबद्ध मार्गाने निर्यात प्रक्रिया सुरू करण्यासाठी पाठबळ देण्यात आले. कंपनीच्या मालकीच्या जागेवरील  240 हेक्टर क्षेत्रावर शेवग्याची झाडे आहेत आणि कंत्राटी पध्दतीने त्यावर प्रमाणित सेंद्रीय पध्दतीने उत्पादन घेतले जाते. कंपनीने 40 मेट्रीक टन शेवग्याच्या पानांची पावडर  अमेरिकेत निर्यात करण्याचा प्रस्तावित आराखडा तयार केला आहे. कंपनीने तेलंगणातील पुल्कल मोंडल संगारेड्डी जिल्ह्यातील गोंगलूर गावात शेवग्याच्या पानांवर प्रक्रिया करून उत्पादन करणारे केंद्र सुरू केले आहे. भारतातून शेवग्याच्या पावडरीची निर्यात वाढविण्यासाठी या  इच्छूक निर्यातदारांसाठी अपेडा सतत सुलभीकरण करत आहे.

अपेडाच्या पाठिंब्याने अधिकाधिक शेवगा प्रक्रिया केंद्रे उभारली जात असून त्यामुळे येत्या काही वर्षांत निर्यातीत वाढ होऊन त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. शेवगा अनेक शतकांपासून  त्याच्या वैद्यकीय गुणधर्मांसाठी आणि आरोग्यदायी लाभांमुळे विविध स्वरूपात वापरला जातो. जागतिक स्तरावर शेवग्याच्या उत्पादनांची मागणी उदाहरणार्थ शेवग्याच्या पानांची पूड ,शेवग्याचे तेल यात सतत निरोगी  वाढ होत आहे. याखेरीज आंतरराष्ट्रीय संघटना आणि संस्था शेवग्याचे पोषक गुण चांगल्या पद्धतीने कसे वापरावेत आणि त्याला अन्नात कसे समाविष्ट करावे याचे सर्वोत्तम मार्ग शोधत आहेत.जगात शेवग्याच्या विविध प्रजाती आढळतात. त्याच्या  पोषणातील,औषधी आणि पाककृतीतील  वापराला  जगभरातील ग्राहकांकडून वाहवा मिळत आहे.