कृषी आणि प्रक्रिया; पहिल्या आभासी व्यापार मेळाव्याचे आयोजन

कोविड 19 महामारीच्या काळात, भारताच्या कृषी व प्रक्रिया केलेल्या खाद्य उत्पादनांच्या निर्यातीची  क्षमता उंचावण्यासाठी, एपीईडीए अर्थात कृषी आणि अन्न प्रक्रिया उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने पहिल्यांदाच आपला पहिला आभासी व्यापार मेळावा सुरू केला. मेळाव्याचा प्रारंभ काल मी 10 मार्च 2021 रोजी झाला तर समारोप 12 मार्च 2021 रोजी होईल.

‘इंडिया राईस अँड अ‍ॅग्रो कमोडिटी’ ही मेळाव्याची संकल्पना आहे. विविध कृषी मालाची निर्यात क्षमता दर्शविण्यावर यात भर देण्यात येणार आहे.  आयात करणारे तसेच निर्यातदार हे मेळाव्यात प्रामुख्याने सहभागी होत आहेत.  संभाव्य खरेदीदार किंवा आयातदार आणि अभ्यागत यांना आभासी मेळाव्यात निर्यातदारांनी सादर केलेल्या खाद्यपदार्थाच्या विस्तृत उत्पादनांची माहिती जाणून घेता येईल.

व्हीटीएफ अर्थात आभासी व्यापार मेळाव्याद्वारे दाखवल्या जाणार्‍या मुख्य उत्पादनांमध्ये बासमती तांदूळ, बिगर बासमती तांदूळ, बाजरी, गहू, मका, भुईमूग आणि भरड धान्ये यांचा समावेश आहे.  आतापर्यंत 135 जणांनी सहभागी सदस्य म्हणून आभासी व्यापार मेळाव्यासाठी नोंदणी केली आहे.  संयुक्त अरब अमिरात, ब्राझील, न्यूझीलंड, फ्रान्स, सौदी अरेबिया, इंग्लंड, अफगाणिस्तान, बहारीन, इजिप्त, फिजी, फिलीपिन्स, कतार, सुदान, म्यानमार, नेदरलँड आणि पेरू येथून इथल्या 266 भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदारांनी सुरुवातीच्या सत्रातच नोंदणी केली आहे.    मेळाव्यातल्या सहभागासाठी परदेशातल्या भारतीय दूतावासांच्या माध्यमातून खरेदीदारांना पूर्ण सहकार्य केले जात आहे. तसेच या आभासी व्यापार मेळाव्याची जोरदार मोहीम सोशल मीडियावर सुरू आहे.

कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर थेट प्रवास आणि व्यापारावर बऱ्याच मर्यादा आल्या असून सध्या अनेक निर्बंध आहेत. अशात अपेडाने भारताच्या कृषी आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या शाश्वत निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी व आपल्या निर्यातीचा ठसा जागतिक बाजारात उमटवण्यासाठी नवीन बाजारपेठेचा शोध घेण्याकरता व्हीटीएफ अर्थात आभासी व्यापार मेळावा  संकल्पना राबवायला सुरूवात केली आहे.

कोविड पूर्वीच्या काळात कृषी खाद्यपदार्थांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी व्यापार मेळावे आणि प्रदर्शन ही महत्त्वाची भूमिका बजावत. व्हीटीएफमध्ये इंटरएक्टिव्ह अर्थात परस्पर संवादी तंत्रज्ञानाचा वापर करून व्यापार सुलभ होईल यावर भर दिला आहे.

व्हीटीएफच्या माध्यमातून, निर्यातदार आणि आयातदार दृक् श्राव्य माध्यमातून म्हणजेच ऑडिओद्वारे तसेच व्हिडिओ सत्राद्वारे कोणत्याही व्यत्ययाशिवाय बैठका, सभा येऊ शकतात.  याशिवाय कार्यशाळा, उत्पादनांचे उद्घाटन (प्रोटक्ट लॉंचिग), थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रीम )आणि वेबिनार सुविधा उपलब्ध आहेत.  आभासी संमेलनात खासगी बैठक खोल्या(प्रायवेट मिटिंग रुम), वैयक्तिकृत बैठकीच्या सुविधा उपलब्ध असतील.

निर्यातदार आणि आयातदारांची अशा संवाद तसेच यादरम्यान होणारी माहिती, डेटा देवाणघेवाण सुरक्षित ठेवली जाईल आणि केवळ संबंधित पक्षांनाच त्याचा अॅक्सेस दिला जाईल .

अशा आभासी उपक्रमांनी खरेदीदार आणि विक्रेते यांना विशेष व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. इथे उभय बाजू समोरासमोर चर्चा करुन व्यवहार ठरवू शकतात. त़्यामुळे थेट व्यवहार केल्याचे  एपीईडीए पहिल्यापासूनच प्रक्रिया ऑनलाइन करण्याच्या दृष्टीने, ट्रेसिबिलिटीची अंमलबजावणी आणि प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत पुढाकार घेण्यात अग्रेसर राहीले आहे.