ऑनलाईन रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासनपरभणी यांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्‍त दिनांक 17 सप्‍टेंबर गुरूवार रोजी सकाळी 11.00 वाजता ऑनलाईन रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले असुन कार्यक्रमाचे उदघाटन भारत सरकारच्‍या कृषि नियोजन आयोगाचे माजी सल्‍लागार तथा कृषि विस्‍तार विशेषज्ञ मा डॉ व्‍ही व्‍ही सदामते यांच्‍या ह्रस्‍ते होणार आहेकार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण राहणार असुन पुणे येथील कृषि तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्‍थेचे (अटारीसंचालक मा डॉ लाखन सिंग हे विशेष अतिथी म्‍हणुन सहभागी होणार आहेत.

ऑनलाईन तांत्रिक सत्रात रबी हंमागातील विविध पिक लागवड तंत्राज्ञानावर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेतयात ज्‍वार लागवडीवर डॉ एल एन जावळेहरभरा लागवडीवर डॉ सी बी पाटीलकरडई लागवडीवर डॉ एस पी म्‍हेत्रेगहु लागवडीवर डॉ यु एम उमाटे मार्गदर्शन करणार असुन शेवटी शेतकरी बांधवाच्‍या रबी पिक लागवडी संबंधित शंकांचे समाधान डॉ यु एन आळसेडॉ ए व्‍ही गुटटेडॉ व्‍ही पी सुर्यवंशीडॉ एस पी पवार आदी करणार आहेत.

ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होण्‍याकरिता झुम अॅप मिटिंग आयडी 953 393 3361 व पासवर्ड 12345 यांचा वापर करावाकार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठ युटयुब चॅनेल www.youtube.com/user/vnmkv वर होणार आहेसदरिल ऑनलाईन रबी मेळाव्‍याच्‍या कार्यक्रमास जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवानी सहभाग नोंदवावाअसे आवाहन आयोजक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ डी बी देवसरकरमुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ व्‍ही बी कांबळे व परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे यांनी केले आहे.