ऐन दिवाळीत कांदा घसरला; शेतकरी संतप्त

कांदा भाव घसरले, नाफेडने कांदा खरेदी करण्याचे शेतकरी संघटनांचे आवाहन

नाशिक : दिवाळीचा सण तोंडावर आल्याने शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजार समितीत आणत आहेत. परंतु  बाजार भावात गेल्या सोमवारपासून झालेल्या मोठ्या घसरणीमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा हिरमोड झालेला आहे. गेल्या आठवड्यापासून कांद्याचे बाजार भाव कमी झाला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असतांना फक्त ग्राहक हित डोळ्यासमोर ठेवून सरकारने घेतलेले निर्णय शेतकऱ्यांना मारक ठरत आहे.राज्यातील कांदा उत्पादकांमध्ये सरकार विरोधात मोठी संतापाची लाट आहे. महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी नाफेडची कांदा खरेदी परदेशातून आयात केलेल्या कांद्याऐवजी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करून घेण्यासाठी केंद्राला भाग पाडावे.यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे .

परदेशातून आयात केलेला कांदा शहरांमध्ये वितरणास सुरुवात झाल्याचा परिणाम कांदा दरात दिसून येत आहे. येथील मुख्य बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत गुरुवारी  कमाल कांदा दरात १५०० तर.सरासरी १६५० रुपयांची घसरण झाली असून कांदा दरात घसरण होत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

गुरुवारी लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमाल ४५५१ रुपये,, सरासरी ३६५१ रुपये तर नवीन लाल कांद्याला कमाल ३७१२ रुपये तर सरासरी ३३०० भाव मिळाला. नव्या लाल कांद्याची आवक पुढील काळात वाढणार आहे. त्याचाही दरावर परिणाम होणार असल्याची धास्ती कांदा उत्पादकांमध्ये आहे.

ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याचे दर घसरत असल्यानं, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. केंद्र सरकारने कांदा आयात केल्यामुळे कांद्याचे दर घसरत असल्याने बळीराजा मध्ये नाराजी व्यक्त होत आहे

कांदा साठवणूक मर्यादेमुळे मागील आठवडय़ात सलग चार दिवस कांद्याचे घाऊक बाजार बंद राहिले होते. लिलाव सुरू झाल्यापासून दरातील तेजी हळूहळू कमी होत आहे. आता परदेशातून आयात केलेला कांदा महानगरांमध्ये वितरित होऊ लागल्याने स्थानिक कांद्याची मागणी घटत असल्याने कांदा दर ही घसरत आहे.

येथील बाजार समिती ५६३ वाहनातून ६२२५ क्विंटल कांद्याची आवक झाली कमाल ४५५१ रुपये ,सर्वसाधारण ३६५१ रुपये तर किमान ११०० रुपये इतका प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाला.लाल कांदा कमाल३७१२ सर्वसाधारण३३०० तर किमान १२८० रुपये दराने विक्री झाला.

नाफेडने कांदा खरेदी करावा

नाफेडच्या माध्यमातून 15 हजार टन कांदा आयात करून मुंबई बंदरावर पाच हजार रुपये क्विंटल दराने उपलब्ध होणाऱ्या कांद्यामुळे राज्यातील कांद्याचे भाव पडून कांदा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्याऐवजी नाफेडने नाशिकसह राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमधून हा कांदा 5 हजार रुपये क्विंटल या दराने खरेदी करावा व कांदा उत्पादकांचे होणारे नुकसान थांबवावे. नाफेडने परदेशी कांदा 5 हजार रुपये क्विंटल या दराने आयात करण्याऐवजी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून याच दराने कांदा खरेदी करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.

आजचे कांदा भाव

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

05/11/2020
कोल्हापूर क्विंटल 2248 1000 5000 3500
औरंगाबाद क्विंटल 937 1000 4500 2750
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 8257 4500 6500 5500
खेड-चाकण क्विंटल 232 2000 6000 4000
श्रीगोंदा- चिंभळे क्विंटल 449 350 5000 4500
मोर्शी क्विंटल 3 2800 5600 4200
सोलापूर लाल क्विंटल 10302 200 6700 2000
अहमदनगर लाल क्विंटल 1925 1000 3500 2800
धुळे लाल क्विंटल 7003 200 5600 4700
लासलगाव लाल क्विंटल 145 1280 3712 3300
जळगाव लाल क्विंटल 1650 1500 4250 2800
मालेगाव-मुंगसे लाल क्विंटल 200 1000 3700 2550
पंढरपूर लाल क्विंटल 386 200 5500 3500
नागपूर लाल क्विंटल 3800 3000 5000 4500
संगमनेर लाल क्विंटल 1452 500 4000 2250
मनमाड लाल क्विंटल 300 1500 3131 2600
साक्री लाल क्विंटल 1950 1500 3500 2500
देवळा लाल क्विंटल 1000 1000 2725 2250
उमराणे लाल क्विंटल 1200 751 5700 3000
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 1190 600 4800 2700
पुणे लोकल क्विंटल 7431 700 4700 2700
पुणे- खडकी लोकल क्विंटल 9 2300 4000 3100
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 2 5500 5500 5500
पुणे-मोशी लोकल क्विंटल 292 3000 4500 3750
मलकापूर लोकल क्विंटल 272 2425 4275 3575
वाई लोकल क्विंटल 15 2500 5000 3750
नागपूर पांढरा क्विंटल 264 4000 5500 5500
अहमदनगर उन्हाळी क्विंटल 19788 1500 4000 3500
लासलगाव उन्हाळी क्विंटल 6225 1100 4551 3651
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 2220 1500 4552 3300
मालेगाव-मुंगसे उन्हाळी क्विंटल 5000 1500 3850 2905
राहूरी -वांभोरी उन्हाळी क्विंटल 6778 500 4000 3000
संगमनेर उन्हाळी क्विंटल 968 500 4551 2525
चाळीसगाव उन्हाळी क्विंटल 670 500 3550 2500
चांदवड उन्हाळी क्विंटल 5000 1000 4450 3000
मनमाड उन्हाळी क्विंटल 2000 1000 3510 3200
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 4080 1000 4899 4225
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 12440 1000 5681 3801
वैजापूर उन्हाळी क्विंटल 1889 500 4700 3500
देवळा उन्हाळी क्विंटल 3530 2000 3950 3450
उमराणे उन्हाळी क्विंटल 8900 1000 5000 3600