केंद्राने निर्यातबंदी हटविताच कांदा वधारला

1 जानेवारी 2021 पासून केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांद्यावरील निर्यातीची बंदी हटवली आहे. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढण्यास मदत होणार आहे.

नाशिक, ता. 29 : कांदा निर्यातबंदी 1 जानेवारीपासून मागे घेण्याची घोषणा करताच बाजारसमित्यांमधील कांद्याचे बाजारभाव दोनशे ते तीनशे रुपयांची वधारले असल्याचे सुखद चित्र आज पाहायला मिळाले. लासलगाव बाजारसमितीत आज उन्हाळी कांदयाला सरासरी 2200 रुपये प्रतिक्विंटरल दर मिळाला. किमान आणि कमाल दरातही वाढ झाल्याचे चित्र होते. पिंपळगांव बसवंतसह राज्यातील कांद्यासाठी महत्त्वाच्या असणाºया बाजारसमित्यांमध्येही कांदा वधारलेला दिसला. शेतकºयांच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब आहे.

दिनांक १४ सप्टेंबरला कांद्याने  तीन हजार उपायांचा चा टप्पा ओलांडला. परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र आज सायंकाळी कांद्यावरील निर्यात बंदीचा निर्णय वाणिज्य मंत्रालयाचे महासंचालक अमित यादव यांनी जाहीर केला.  वाणिज्य मंत्रालयाने १५ मार्च २०२० रोजी कांद्यावरील निर्यातबंदी उठवत पुन्हा निर्यात खुली केलेली होती. मात्र आता त्यावर बंदी घातल्याने शेतकार्यांमध्ये रोष निर्माण झाला होता.

निर्यात बंदी नंतर केंद्र सरकारने निर्यात होणारा कांदा हा मुंबई पोर्टवर,  तर बांगलादेश बॉर्डर वर दिवसभर रोखून धरल्याने या अघोषित निर्यात बंदी मुळे कांद्याच्या बाजारभावात पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादकांना फटका बसला होता.

लासलगाव व पिंपळगाव बाजारसमित्यांमध्ये मागील चार ते पाच दिवसांचे बाजारभाव.

बाजार समिती : लासलगाव

दर रु. प्रती क्विंटल

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
29/12/2020
कांदा लाल क्विंटल 14052 1000 2668 2400
कांदा उन्हाळी क्विंटल 170 801 1981 1500
28/12/2020
कांदा लाल क्विंटल 14710 1200 2072 1951
कांदा उन्हाळी क्विंटल 664 500 1680 1400
26/12/2020
कांदा लाल क्विंटल 5314 1000 2351 2050
कांदा उन्हाळी क्विंटल 512 800 1938 1580
25/12/2020
कांदा लाल क्विंटल 10414 900 2445 2125
कांदा उन्हाळी क्विंटल 812 600 2202 1601
24/12/2020
कांदा लाल क्विंटल 14602 900 2401 2150
कांदा उन्हाळी क्विंटल 910 500 2051 1550
23/12/2020
कांदा लाल क्विंटल 11142 1201 2412 2050
कांदा उन्हाळी क्विंटल 1168 541 2121 1800
22/12/2020
कांदा लाल क्विंटल 11088 1200 2340 2150
कांदा उन्हाळी क्विंटल 1704 500 1901 1650

बाजारसमिती : पिंपळगाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
29/12/2020
कांदा पोळ क्विंटल 14082 1000 2881 2251
कांदा उन्हाळी क्विंटल 1320 951 2600 2325
28/12/2020
कांदा पोळ क्विंटल 18840 751 2175 1700
कांदा उन्हाळी क्विंटल 3967 851 2090 1551
26/12/2020
कांदा पोळ क्विंटल 11048 801 2346 1901
कांदा उन्हाळी क्विंटल 2382 751 2119 1781
25/12/2020
कांदा पोळ क्विंटल 13822 800 2358 2000
कांदा उन्हाळी क्विंटल 2283 500 2626 1801
टोमॅटो क्विंटल 6251 205 1755 755
24/12/2020
कांदा पोळ क्विंटल 16327 700 2600 2001
कांदा उन्हाळी क्विंटल 3023 800 2375 1711
23/12/2020
कांदा पोळ क्विंटल 15125 600 2455 1911
कांदा उन्हाळी क्विंटल 2815 1200 2571 1651
22/12/2020
कांदा पोळ क्विंटल 13394 600 2445 1851
कांदा उन्हाळी क्विंटल 4216 1200 2435 1621