देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढतोय. या पार्श्वभूमीवर इलाहाबाद हायकोर्टाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुका पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे. असे असतानाच महाष्ट्रातील पालिका, नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. आज विधानसभेत यावर चर्चा झाली. त्यामुळे राज्यातील निवडणुका पुढे ढकलल्या जाणार असल्याची चर्चा आहे.
शिवसेनेचे नेते प्रभू म्हणाले की, ओमिक्रॉनचे रुग्ण उत्तर प्रदेशात वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात अशी सूचना इलाहाबाद कोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे. ही परिस्थिती पाहून निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावा लागणार आहे. निवडणूक पुढे ढकलल्या जातील की नाही याबाबत मी काही भविष्य करणार नाही. पण महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले तर निवडणूक आयोगाला समान निर्णय घ्यावा लागेल, असे प्रभूंनी म्हटले आहे.