सलग 13 व्या दिवशी देशातील इंधनाचे दर स्थिर राहिले आहेत. मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर 109.98, तर डिझेलचे दर 86.67 असे राहिले.
दिवाळीपूर्वी लिटरमागे पेट्रोलचे दर 116 रुपयांच्याच्या पुढे जाऊन पोहोचले होते. मात्र केंद्र सरकारने आपल्या कराचा वाटा कमी केल्याने पेट्रोल प्रति लिटर पाच, तर डिझेलच्या किमती प्रति लिटर 10 रुपयांनी कमी झाल्या. त्यानंतर केंद्राच्या आवाहनानुसार अनेक राज्यांनी आपल्या राज्यातील व्हॅट कर घटवले आणि सामान्यांना दिला दिला. मात्र काही राज्यांनी अजूनही या बाबत पाऊल उचलले नव्हते. त्यात विशेषत: कॉँग्रेसशासित राज्यांचा समावेश होता. आता अशाच एका कॉँग्रेसशासित राज्यातने इंधनावरील व्हॅट कमी केल्याने सामान्यांना दिलासा मिळणार आहे. याशिवाय इंधनाचे दर स्थिर राहिल्यानेही सामान्यांना दिलासा मिळत आहे.
इतका कमी केला व्हॅट
राजस्थान सरकारने काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला. त्यानुसार आज दिनांक 17 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12 पासून हा इंधनाचे दर कमी झाले आहेत. पेट्रोलवरील व्हॅट 4 रुपयांनी, तर डिझेलवरील व्हॅट 5 रुपयांनी प्रति लिटर या प्रमाणे कमी करण्यात आला आहे. त्यामुळे आता या राज्यात केंद्राचे पाच आणि राज्याचे 4 असे मिळून पेट्रोल 9 रुपयांनी, तर डिझेल एकूण 15 रुपयांनी स्वस्त होणार आहे. या निर्णयामुळे राजस्थानला वार्षिक साडेतीन हजार रुपयांच्या महसूलावर पाणी सोडावे लागणार आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या निर्णयाची माहिती समाजमाध्यमातून दिली होती. केंद्राच्या करकपातीनंतर येथील विरोधी पक्ष भाजपाने दबाव आणल्यानंतर या किंमती कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राजस्थानशिवाय कॉँग्रेसशासित पंजाबने मोठी करकपात केल आहे. पंजाबने पेट्रोलवरील 16.02 रुपये, तर डिझेलवर 19.61 रुपये इतकी मोठी करकपात केली आहे. तेथील इंधन दर आता खूप घटले आहेत. आज अमृतसर येथे पेट्रोलचे दर 94.90 प्रतिलिटर होते.
केंद्रानंतर या राज्यांनी केलेत इंधन व्हॅट कमी
केंद्राच्या इंधन कर कपातीच्या निर्णयानंतर आणि राज्यांना केलेल्या आवाहनानंतर अनेक राज्यांनी आपापल्या परीने इंधनावरील व्हॅट कमी केले होते. त्यात कर्नाटक, पुडूच्चेरी, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालॅँड, त्रिपुरा, आसाम, सिक्कीम, बिहार, मध्यप्रदेश, गोवा,गुजरात, दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव, हरियाणा, चंडीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, लडाख या राज्यांचा समावेश आहे. मात्र जिथे भाजपाची सत्ता नाही असे महाराष्टÑ, दिल्ली, पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांनी अजूनही व्हॅट घटविलेले नाहीत.
आंतरराष्टÑीय बाजारपेठेत इंधन दर घटले
सलग तिसºया आठवड्यात आंतरराष्टÑीय बाजारपेठेत इंधनाचे दर घटले आहेत. मात्र ब्रेंट क्रूड आॅईलच्या किंमती प्रति बॅरल 81 वरून 85 डॉलरवर पोहोचल्या. दुसरीकडे डॉलर वधारल्याने त्याचाही दबाव कच्च्या तेलाच्या किंमतीवर पडला आहे. या सर्वांचा परिणाम इंधनाचे दर स्थिर राहण्यात झाला आहे. असे सांगण्यात येत आहे की अमेरिका आगामी काळात धोरणात्मक निर्णय म्हणून आपल्याकडील कच्च्या तेलाच्या राखीव साठ्यातून इंधनाचा पुरवठा वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात आवक वाढून इंधन दर स्थिर राहतील.