Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कोविड सक्रीय रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1.13%

दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (1.94%) गेले 24 दिवस 3% पेक्षा कमी

देशात गेल्या 24 तासांत, लसीच्या 56,36,336 मात्रा देण्यात आल्या असून भारतातील लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येने (56,64,88,433) काल 56 कोटी 64 लाखांचा टप्पा पार केला. हे यश 63,13,210 लसीकरण सत्रांच्या आयोजनातून साध्य करण्यात आले.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येची गटनिहाय विभागणी खालीलप्रमाणे आहे:

HCWs 1st Dose 1,03,52,028
2nd Dose 81,56,910
FLWs 1st Dose 1,82,95,288
2nd Dose 1,23,75,946
Age Group 18-44 years 1st Dose 20,84,79,874
2nd Dose 1,73,21,864
Age Group 45-59 years 1st Dose 12,05,14,789
2nd Dose 4,73,45,647
Over 60 years 1st Dose 8,24,60,190
2nd Dose 4,11,85,897
Total 56,64,88,433

संपूर्ण देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग वाढविणे आणि मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करणे यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.

गेल्या 24 तासांत 39,157 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे (महामारीच्या सुरुवातीपासून) कोविडमधून बरे झालेल्यांची संख्या आता 3,15,25,080 झाली आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर सध्या 97.53% म्हणजे मार्च 2020 पासूनच्या सर्वात उच्चांकी पातळीवर आहे.

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळे गेले सलग त्रेपन्न दिवस, रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे

गेल्या 24 तासांत, भारतात फक्त 36,401 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

रोगमुक्तांची वाढती संख्या आणि नव्याने बाधित होणाऱ्यांची कमी झालेली संख्या यांच्यामुळे देशातील सक्रीय कोविड रुग्णांची संख्या 3,64,129 झाली आहे जी गेल्या 149 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. सध्याच्या कोविड सक्रीय रुग्णांची संख्या देशातील एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1.13% म्हणजेच मार्च 2020 पासूनच्या सर्वात नीचांकी पातळीवर आहे.

देशात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांच्या क्षमतेचा विस्तार सुरु असून गेल्या 24 तासांत एकूण 18,73,757 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 50 कोटी 3 लाख (50,03,00,840) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड चाचण्यांच्या क्षमतेचा विस्तार करत असताना, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.95% आहे, हा दर गेले 55 दिवस 3%हून कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील आज 1.94% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आता गेले 24 दिवस 3% हून कमी आणि सलग 73 दिवस 5% हून कमी राहिला आहे.

Exit mobile version