Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

आता कुठल्याही प्लॅनवर मोबाईल क्रमांक करता येणार पोर्ट

मोबाईल कंपन्यांनी प्रत्येक टॅरिफमध्ये मोबाईल पोर्ट मिळण्याची सुविधा द्यावी या संदर्भात ग्राहकांच्या तक्रारीवर ट्रायने पाऊल उचलले आहे. त्यामुळे कंपन्याच्या वर्चस्वाला आळा बसणार असून मोबाईल ग्राहकांना त्याचा लाभ होणार आहे.

काय म्हणाले ट्राय?
दूरसंचार नियामक TRAI ने मोबाईल नंबर पोर्ट करणार्‍या ग्राहकांना सर्व टॅरिफ, व्हाउचर किंवा प्लॅनमध्ये ही सुविधा देण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रायने मंगळवारी सांगितले की, सर्व दूरसंचार कंपन्यांनी ग्राहकांच्या विद्यमान टॅरिफ, व्हाउचर किंवा प्लॅनमध्ये पोर्टिंगची सुविधा समाविष्ट करावी.

असे दिले निर्देश
ट्रायच्या म्हणण्यानुसार, कंपन्या अनेक प्रीपेड व्हाउचरमध्ये आउटगोइंग एसएमएस सुविधा देत नाहीत. यामुळे, ग्राहक त्यांचा नंबर पोर्ट करण्यासाठी 1900 वर यूपीसी नंबरसाठी एसएमएस करू शकत नाहीत. यासाठी कंपन्या ग्राहकांना खात्यात आवश्यक शिल्लक ठेवण्यास सांगतात. यासंबंधीच्या तक्रारी आल्यानंतर ट्रायने सर्व प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांना ही सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. आता ग्राहकाच्या खात्यात पुरेशी शिल्लक नसली किंवा कोणत्याही टॅरिफमध्ये आउटगोइंग एसएमएस सुविधा नसली तरीही मोबाइल पोर्ट संदेश पाठवले जाऊ शकतात.

Exit mobile version