आता शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत कृषी तंत्रज्ञान होणार अवगत

 किसान मित्र कार्यालय आणि कृषी विज्ञान केंद्र यांची भागीदारी

कृषी सादरीकरणाच्या शृंखलेतील 28 व्या आवृत्तीमधील पाहुणे होते पंजाबमधील शेतकरी बलराज ज्यांनी वातावरणातील आर्द्रता मोजण्यासाठी सेन्सर बसवल्याने त्यांच्या सिंचनाच्या पद्धतीत काय परिणाम झाला याबद्दल माहिती दिली. त्यांच्या गावात वीज नाही आणि ते डिझेलवर चालणारे पंप वापरतात. हा सेन्सर लावल्याने डिझेल आणि पाणी दोन्हीची बचत झाली (पंप चालविण्याचे 15-20 तास वाचले). सेन्सर मातीच्या खालच्या थरांमध्ये ओलावा शोधण्यात सक्षम होता. त्यांना पीक उत्पादन आणि मातीच्या आरोग्यामध्ये सुधारणा आढळली. हा सेन्सर म्हणजे कृषी तंत्रज्ञान स्टार्टअपचे उत्पादन आहे.

कृषी तंत्रज्ञानाच्या स्टार्ट-अपसाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्यांचे शेवटचे वापरकर्ते – एफपीओ (कृषी उत्पादन संस्था) आणि कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके) यांच्यापर्यंत पोहोचणे. किसानमित्र ही एक संकल्पना होती जी मागणीनुसार पुरवठा करण्यात यशस्वी झाली आहे. स्टार्ट अप्स केव्हीकेमार्फत शेतकऱ्यांना आधार देऊ शकतात आणि शेतकरी त्यांच्या काही आव्हानांवर तोडगा काढू शकतात.

भारतीय संशोधन संस्थांमधील तंत्रज्ञान विकासकांनी कृषी सादरीकरणाच्या मालिका आणि त्यांच्याशी निगडित स्टार्ट-अपनी विविध संकल्पना, शेती व्यवस्थापन, काढणी पश्चात व्यवस्थापन, संबद्ध शेती इ. मधील सुमारे 150 कृषी तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यास मदत केली आहे. भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयांतर्गत त्या तयार करण्यात आल्या आहेत. तंत्रज्ञानाचे मूल्यांकन करण्यासाठी आणि तंत्रज्ञानाद्वारे शेतीचा मागणी आणि पुरवठा यांची सांगड घालण्यासाठी प्रामुख्याने मागणी करणाऱ्या सदस्यांकरिता (उद्योग आणि इनक्यूबेटर) सादरीकरण केले जाते.

3 जुलै 2021 रोजी 28 व्या आवृत्तीत बोलताना, डॉ. ए. के. सिंह, उप-महासंचालक, (कृषी विस्तार) आयसीएआर यांनी असे निदर्शनास आणून दिले की, शेतकर्‍यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तंत्रज्ञानयुक्त उपाययोजना विकसित करण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनातून किसानमित्र मदत करीत आहेत. या वेबिनारच्या स्थानिक भाषेमधील सत्र घेणाऱ्या संस्थेचे कौतुक करीत, त्यांनी अशी आशाही व्यक्त केली की आगामी वेबिनारमध्ये अधिक शेतकरी एकत्रित येऊन त्यांच्या समस्यांबद्दल बोलू शकतील आणि त्यांना कोणत्या तंत्रज्ञान उपायांची गरज आहे ते सांगू शकतील. याची 28 वी आवृत्ती येथे पहा:

https: //www.youtube.com/ watch?v = 8SyC2G2DRT0

स्वयंसेवी संस्थांमध्ये स्थानिक भाषेमधील मित्रांचे आयोजन करणाऱ्या संस्थांमध्ये व्हीआयटी स्कूल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल इनोव्हेशन्स अँड लर्निंग, वायल (तमिळ) आणि ग्रामीण इनक्यूबेशन सेंटर (तेलगू) यांचा समावेश आहे. गुजराती, मराठी आणि राजस्थानी भाषेतील सत्रांसाठी हे संघ इतरांशी चर्चा करीत आहेत.

किसानमित्र विषयी:

किसानमित्र किंवा ‘शेतकर्‍यांचे मित्र’ हा भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाचा एक उपक्रम आहे. संकेतस्थळ आहे: https://kisanmitr.gov.in/

भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाबद्दल:

नोव्हेंबर 1999 मध्ये कॅबिनेट सचिवालयात भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार यांचे कार्यालय स्थापन झाले . विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापरावर लक्ष केंद्रित करून विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण विषयांवर पंतप्रधान आणि कॅबिनेटला व्यावहारिक व वस्तुनिष्ठ सल्ला देणे हे पीएसएच्या कार्यालयाचे उद्दीष्ट आहे.

केव्हीके बद्दलः

कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके) त्याच्या अंमलबजावणीसाठी आणि क्षमता बांधणीसाठी “तंत्रज्ञानाचे मूल्यांकन व प्रात्यक्षिक” या आदेशानुसार कार्य करतात. ही केंद्रे राष्ट्रीय कृषी संशोधन प्रणाली (एनएआरएस) चा एक भाग आहेत, ज्याचा हेतू तंत्रज्ञान मूल्यांकन, परिष्करण आणि प्रात्यक्षिकाद्वारे कृषी आणि संबंधित उद्योगांमधील स्थान-विशिष्ट तंत्रज्ञान मोड्यूल्सचे मूल्यांकन करणे आहे.

भारतीय सीएसटी बद्दलः

पीएसए कार्यालय भारतीय समाज परिवर्तन संस्था (भारतीय सीएसटी) (www.indiancst.in), या नोंदणीकृत सार्वजनिक ट्रस्टशी निगडित असून ज्यांनी पशुसंवर्धन, दुगधविकास आणि मत्स्यपालन मंत्रालयासाठी (तत्कालीन कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयासाठी) 26.11.2016 पासून https://epashuhaat.gov.in विकसित केले आणि ते कार्यरत ठेवले.

एनएसआरसीएल बद्दल:

विशेषत: फायदेशीर उद्योग आणि सामाजिक उपक्रम असणार्‍या उद्योजकांना, विद्यार्थी आणि महिला उद्योजकांना सेवा पुरवणाऱ्या कार्यक्रमांसह आयआयएमबीचे एनएसआरसीईएल स्टार्टअप इकोसिस्टमच्या विविध सहभागींना समर्थन देतात.