Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

गेल्या 24 तासात 33,750 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.20%

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालांनुसार भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने गेल्या 24 तासांत लसीच्या 23,30,706 मात्रा देऊन, एकूण 145 कोटी 68 लाख(1,45,68,89,306) मात्रा देण्याचा टप्पा पार केला आहे.1,56,67,018 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:

 

HCWs

1st Dose 1,03,88,070
2nd Dose 97,18,259
 

FLWs

1st Dose 1,83,85,916
2nd Dose 1,69,09,762
 

Age Group 18-44 years

1st Dose 50,10,03,289
2nd Dose 33,64,20,548
 

Age Group 45-59 years

1st Dose 19,48,87,002
2nd Dose 15,17,39,990
 

Over 60 years

1st Dose 12,16,14,662
2nd Dose 9,58,21,808
Total 1,45,68,89,306

गेल्या 24 तासांत 10,846 रुग्ण बरे झाल्यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येत (महामारीच्या आरंभापासून ) वाढ होऊन ती संख्या 3,42,95,407 झाली आहे.

परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.20% इतका आहे.

केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि एकत्रित प्रयत्नांमुळे गेल्या 189 दिवसांपासून दररोज 50,000 पेक्षा कमी नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे.

गेल्या 24 तासात 33,750 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली.

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 1,45,582 आहे. देशात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.42% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे.गेल्या 24 तासात एकूण 8,78,990 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आत्तापर्यंत एकूण 68.09 कोटींपेक्षा जास्त (68,09,50,476) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवली जात असताना, देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.68% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.84%इतका नोंदविण्यात आला आहे.

Exit mobile version