Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

राज्यात तुर्तास लॉकडाऊन नाही

राज्यात ओमायक्रॉनबाधितांची संख्या वाढत असली तरी राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वाढती गर्दी आणि रुग्णसंख्या पाहता निर्बंध अधिक कडक करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुमारे तासभर झालेल्या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य सचिव, वैद्यकीय शिक्षण सचिव आणि मुख्य सचिवही उपस्थित होते. यावेळी राज्यात कोणताही लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, नागरिकांनी गर्दी करू नये म्हणून निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कंटेन्मेट झोन वाढवणे, लसीकरण वेगाने करणे, रुग्णालयांची सज्जता आदींचा आढावा यावेळी घेण्यात आल्याचे कळते. या बैठकीचा इतिवृत्तांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिला जाणार आहे.

Exit mobile version