देशातील खतांच्या उपलब्धतेबाबत केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडविया यांची राज्यांच्या कृषीमंत्र्याशी बैठक
केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज विविध राज्यांचे कृषीमंत्री आणि खते विभाग आणि कृषी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत चर्चा केली.
देशात खतांची कोणतीही टंचाई नसल्याची ग्वाही मांडविय यांनी या बैठकीदरम्यान दिली. शेतकऱ्यांसाठी खतांचा पुरेसा साठा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशभरात खतांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी राज्यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांशी योग्य प्रकारे वेळच्या वेळी समन्वय राखावा असे निर्देश खत राज्यमंत्र्यांनी दिले.
काही राज्यांच्या कृषीमंत्र्यानी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यात सहभाग घेतला. यावेळी खते विभागाचे सचिव तसेच संयुक्त सचिव छबिलेंद्र राऊल यांच्यासह विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.