राज्य सरकारची ‘अनलॉक ४’ साठी नियमावली जाहीर
महाराष्ट्र सरकारने आता दोन जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी आवश्यक असलेली ई- पासची अट रद्द केली आहे. उद्या दिनांक 1 सप्टेंबरपासून राज्यांत फिरण्यासाठी ई- पासची गरज लागणार नाही. मात्र कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळावे लागणार आहेत. याशिवाय खासगी तसंच मिनी बसेसना परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल आणि लॉज यांनाही पूर्णपणे सुरु होण्यास परवानगी देण्यात आली आहे.. मिशन बिगीन अगेन 4 याअंतर्गत काही बाबींना परवानगी देण्यात आली आहे, यानुसार दोन सप्टेंबर पासून जिल्हाअंतर्गत परिवहन सुरू करण्यात येणार आहे, खाजगी बस मध्ये प्रवास करण्याची प्रवाशांना अनुमती असेल, परिवहन आयुक्त यासंदर्भात निर्देश जारी करतील,
असे असले तरी राज्य सरकारने ३० सप्टेंबर पर्यंत लॉक डाऊन सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यासाठी नवी नियमावलीहि जाहीर केली आहे.
Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown. (1/3)#MissionBeginAgain pic.twitter.com/2tgFa8poco
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 31, 2020
शाळा-कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंदच
- शाळा-कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंदच
- 30 सप्टेंबरपर्यंत मेट्रो ही बंद..
- खासगी बस आणि मिनी बसला परवानगी
- चित्रपटगृह 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार
- मंदिरं आणि जिमबद्दल अद्याप घोषणा नाही
- राज्यातील हॉटेल आणि लॉज 100 टक्के सुरु होणार
- संस्कृतिक, सामाजिक, क्रीडा शैक्षणिक क्षेत्रातले कार्यक्रम तसेच मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र येता येणार नाही
- अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आधीच्या नियमावलीचे पालन करतील
- मुंबई आणि एमएमआर एरिया तसेच पुणे पिंपरी या क्षेत्रांमध्ये ऑफिसमध्ये 30 टक्के कर्मचारी उपस्थिती राहता येईल
- सर्व कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य
- प्रवास करताना चालकासह टॅक्सीत चार तर रिक्षामध्ये तीन प्रवाशांना मुभा
- खासगी चारचाकी वाहनात चार लोकांना प्रवास करण्याची मुभा
- 50 पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येता येणार नाही
- अंत्यविधीसाठीही 20 पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊ शकणार नाही