Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

निफाडची पहिली तरुणी सैन्यात भरती

निफाड ( प्रतिनिधी ) – निफाड तालुक्यातील गाजरवाडी येथील सायली बाळासाहेब गाजरे ही तरुणी बिकट परिस्थितीत लष्करात दाखल होणारी निफाड तालुक्यातील पहिली तरुणी ठरली आहे.

निफाड तालुक्यातील गाजरवाडी या शेतीप्रधान गावात आपल्या कुटुंबा सोबत काळ्या आईची सेवा करणाऱ्या सायलीने देशसेवेसाठी कठोर परिश्रम घेत कुठल्याही परिस्थीतीत सैन्यात दाखल व्हायचच असा निर्धार केला होता. त्यासाठी तिने निफाड येथील पॉवर हाऊस अकॅडमीत प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. अकादमीचे संचालक असीम शेख यांनी सायली कडून कसुन सराव करून घेतला. जिद्द, चिकाटी आणि सततच्या सरावाने ती चांगलीच तयार होऊ शकली. कठोर सरावानंतर दिवसभर अभ्यास करून घरी शेतीच्या कामात देखील ती हातभार लावीत असे.

तीन महिन्यांच्या खडतर परिश्रमानंतर 2019 साली तिने आर्मीचा फॉर्म भरल्यानंतर मैदानी चाचणीत शंभर मुलींमध्ये सायलीने पहिला क्रमांक मिळवला. एका शेतकर्‍याच्या मुलीने जिद्दीची जोरावर नाशिक जिल्ह्यातील पहिली महिला फौजी घेण्याचा बहुमान मिळवला. निफाड तालुका नव्हे तर पूर्ण नाशिक जिल्ह्याला तीचा सार्थ अभिमान आहे.

शेती अन मातीशी नातं सांगणाऱ्या माझ्या बहीनीची सैन्यदलात झालेली निवड आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आधी तिला लष्करात जाण्यासाठी विरोध होता परंतु तीचे ध्येय आणि जिद्द यामुळे तिचे स्वप्न पुर्ण झाल्याचा आम्हाला आनंद आहे.- स्वप्नाली गाजरे (बहीण)

Exit mobile version