Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

रेल्वे प्रवाशांसाठी आता “139” ही हेल्पलाईन

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना असलेल्या सर्व चौकशी, तक्रारी तसेच मदतीसाठी भारतीय रेल्वे विभागाने “139” या एकीकृत रेल मदत हेल्पलाईन क्रमांकाची केली घोषणा

रेल्वे प्रवासादरम्यान येणाऱ्या विविध समस्या आणि आवश्यक चौकशांसाठी वेगवेगळ्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याच्या गैरसोयीपासून रेल्वे प्रवाशांची सुटका करण्याच्या उद्देशाने प्रवासादरम्यान प्रवाशांना काही समस्या उद्भवल्या किंवा काही चौकशी करावयाची असेल तर त्यासाठी भारतीय रेल्वे विभागाच्या “139” या एकाच एकीकृत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. सध्या परिचलनात असलेल्या रेल्वेच्या सर्व हेल्पलाईन क्रमांकांऐवजी आता “139” हा एकच  क्रमांक अस्तित्वात आला आहे. प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्या, तक्रारी किंवा चौकशांसाठी आता हा एकच क्रमांक लक्षात ठेवून त्यावर संपर्क साधावयाचा आहे.

रेल्वे विभागाच्या तक्रार निवारण हेल्पलाईन्स गेल्या वर्षी खंडित करण्यात आल्या. आता, येत्या 1 एप्रिल 2021 पासून 182 हा सध्या परिचालनात असलेला हेल्पलाईन क्रमांक देखील खंडित होईल आणि त्यावरील सेवा 139 क्रमांकाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये विसर्जित होतील.

हेल्पलाईन क्रमांक 139 च्या सेवा 12 भाषांमध्ये उपलब्ध असतील. प्रवाशांना आयव्हीआरएस प्रणालीद्वारे ही सेवा वापरता येईल किंवा फोन वरील * (अस्टेरीस्क) हे चिन्ह दाबून कॉल सेंटर मधील सहाय्यकाशी प्रत्यक्ष बोलता येईल. 139 या क्रमांकावर संपर्क साधण्यासाठी स्मार्ट फोन उपलब्ध असण्याची गरज नाही. त्यामुळे सर्व प्रकारचे फोन वापरणारे प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.

सध्या 139 या हेल्पलाईन क्रमांकावर चौकशीसाठी सरासरी प्रतिदिन 3,44,513 कॉल अथवा संदेश येत आहेत.

139 हा हेल्पलाईन क्रमांक आयव्हीआरएस प्रणालीनुसार वापरण्याची पद्धत खाली दिली आहे:

रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना नव्या हेल्पलाईन क्रमांकाची माहिती देऊन त्याच्या वापराविषयी प्रशिक्षण देण्यासाठी  समाज माध्यमांवर  #OneRailOneHelpline139 हे अभियान देखील सुरु केले आहे.

Exit mobile version