कोरोनाच्या संकटामुळे भारताची अर्थव्यवस्था घसरणीला लागली, मात्र त्यातही एक दिलासादायक गोष्ट म्हणजे शेती, शेतकरी आणि शेतमाल यांच्यामुळे या संकटकाळात अर्थव्यवस्था सावरून धरली. बाजारभावाचा अंदाज घेत, योग्य नियोजन केलं, तर आजही ‘उत्तम शेती’ ही उक्ती खरी ठरते.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदुरशिंगोटे या गावच्या विनायक हेमाडे यांनी अवघ्या 41 दिवसांत शेतीतून पिकवलेल्या कोथिंबीरीतून मिळवलेले उत्पन्न पाहिले, तर अनेकांना शेती हा फायदेशीर व्यवसाय आहे, हे पटल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या चार एकर कोथिंबीरीला जवळच असलेल्या दापूर गावचे व्यापारी शिवाजी दराडे यांनी १२.५१ लाख रूपयांचा भाव दिला आहे. विशेष म्हणजे अजून कोथिंबीर शेतातच आहे, त्यापूर्वीच त्यांना हे पैसे मिळालेत.
पिक पद्धत बदलली
विनायक नेमाडे यांची ऐन मंदीतल्या काळातही ही यशकथा सर्वच शेतकरी बांधवांना प्रेरणा देणारी ठरली आहे. श्री. हेमाडे गेल्या अनेक वर्षांपासून कांदा, ज्वारी, बाजरी गहू सारखी पिके घेतात. यातून दैनंदिन गरजा भागतील इतकेच उत्पन्न मिळे. यंदा मात्र बाजाराचा अंदाज घेऊन त्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत धने पेरण्याचे ठरविले. त्यासाठी बाजारात नवीन आलेल्या कोथिंबिरीच्या वाणाचा वापर त्यांनी केला.
अवघ्या 41 दिवसांत कोथिंबीर चांगलीच तरारली. मात्र त्यासाठी त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना सातत्याने मेहनत मशागत करावी लागली. त्यात त्यांना साथ दिली त्यांच्या पत्नीने. खरं तर त्या शहरी भागातल्या असल्याने त्यांना शेतीची फारशी माहिती नव्हती, मात्र तरीही त्यांनी पतीला शेतीकामात मदत केली. या सर्वांचा परिणाम 41 दिवसांत कोथिंबीर तरारली.
चार एकरातून झाली चांदी
एकूण साडेपाच एकरात त्यांनी कोथिंबीर लागवड केली होती, त्यासाठी त्यांना एकरी साधारण 40 हजार रुपये खर्च आला. त्यांच्या शेतातील कोथिंबीरीचा दर्जा आणि भरघोस उत्पादन पाहून त्यांच्या शेजारीच असलेल्या दापूर गावाचे व्यापारी शिवाजी दराडे यांनी जागेवरच सर्व कोथिंबीर काढणीपूर्वीच खरेदी केली. त्यापोटी त्यांना तब्बल साडेबारा लाख रूपये रोख दिले. म्हणजेच त्यांना सुमारे 11 लाखांचा निव्वल नफा झाला.
मेहनत आणि प्रयोगशीलतेच्या सोबतच बाजारपेठेचा अंदाज आणि आपल्या शेतमालाच्या विक्री कौशल्याची समज आली, तर शेतकरी हा खºया अर्थाने ‘बळी राजा’ होऊ शकतो आणि शेती फायद्याची करून देशाची अर्थव्यवस्था सावरू शकतो. विनायक हेमाडे यांच्या यशकथेतून हीच बाब अधोरेखित होते.
नफ्याचे गणित
पहिला लॉट : 1.5 ऐकर – 2.5 लाखदुसरा लॉट : 4 ऐकर – 12.51 लाख
व्यापारी: शिवाजी कचरू दराडे, दापूर
शेतकऱ्याचे नाव : विनायक शिवनाथ हेमाडे
मो.: 7276463765वाण: रॉयल ग्रीन (NOVEL’S ROYAL GREEN)
कंपनी : नोवेल सिड्स प्रा. लि.
(Video courtesy : Novel Seeds)
(महत्त्वाची सूचना : कृषी पंढरी कोणत्याही कंपनीच्या वाणाची शिफारस करत नाही. या लेखात तसा आमच्या कोणताही उद्देश नाही. शेतकऱ्यांनी यश कथा वाचून पिक पद्धत ठरविताना स्थानिक हवामान, बाजारभाव यांचा विचार करावा आणि तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. अधिक माहितीसाठी आमच्या नियम आणि अटी- वाचाव्यात. )
