Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

महिनाअखेर मुंबई अनलॉक होणार

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या घटत असल्याने महापालिकेने या महिन्याच्या अखेरीस शहरातील निर्बंध कमी करण्याचा आणि शहर अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. हाच ट्रेंड पुण्यातही दिसून येत असून निर्बंध कधी हटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पेडणेकर म्हणाल्या, “मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या महिन्याच्या अखेरीस मुंबई अनलॉक होईल. मुंबईतील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु लोकांनी मास्क लावणे आणि सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक असेल.”

मुंबईमध्ये २१ डिसेंबरपासून कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली. या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली होती. त्यानुसार मुंबईमध्ये रुग्णालये, नर्सिंग होमममध्ये ३५ हजारांहून अधिक बेड तयार करण्यात आले होते. बंद केलेले जंबो सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले होते. मात्र, अपेक्षित संख्येपेक्षा कमी रुग्ण आढळत आहेत. शहरात सध्या दैनंदिन तीनशे ते पाचशे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या महिन्याअखेरीस शहर अनलॉक होईल, असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version