महाराष्ट्रात भाजीपाल्यांना हमीभाव देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देणार

“विकेल ते पिकेल” रयत बाजाराचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

विकेल ते पिकेल ही राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची संकल्पना लातूर महानगर पालिकेने दिलेल्या जागेवर कृषि विभागाने अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे.लातूर जिल्हा सोयाबीन, साखर आणि दाळींच्या उत्पादनात देशात अग्रजन्य आहे आता भाजीपाला विक्री या क्षेत्रातही लातूर पॅटर्न राज्य आणि देशासाठी दिशा दर्शक ठरणार असे प्रतिपादन जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय प्रशिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज लातूर येथे केले.ते विवेकानंद चौक नांदेउ रोड येथे पाण्याची टाकी परिसरात विकेल ते पिकेल या धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान या संकल्पनेवर आधिरित शेतकरी ते ग्राहक भाजीपाला विक्री स्थापनेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. लातूर महानगर पालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाठ, सुभाष घोडके, ॲड. किरण जाधव, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कृषी विद्यावेत्ता डॉ. अरुण गुट्टे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प संचालक आर. एस. पाटील, आत्माचे प्रकल्प संचालक बालाजी किरवले, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, तालुका कृषी अधिकारी महेश क्षीरसागर, कृषी विकास अधिकारी सुभाष चोले, तालूका कृषि अधिकारी एच.एम. नागरगोजे, नगरसेवक सचिन बंडापल्ले, विजयकुमार साबदे, दत्ता मस्के, रघुनाथ मदने, मंगेश बिराजदार, इमरान सय्यद आदि मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देशमुख पूढे म्हणाले की, राज्य शासन आणि मुख्यमंत्री यांनी जारी केलेल्या या अभियानास लातूर महानगरपालिका आणि कृषि खात्याने उत्तम प्रतिसाद देत स्वच्छ व ताज्या फळ, भाज्या रास्त आणि वाजवी दरात जनतेला उपलब्ध्‍ करुन देण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे. या अभियानाचा रास्त फायदा लोकांना आणि शेतकरी बांधवांना मिळणार. अशा प्रकारचे आणखी 5 रयत बाजार शहरातील पाच ठिकाणी सुरु होणार असून जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्येसुध्दा रयत बाजार सुरु करण्यात येतील.

लातूर हा शेतीप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो.साखर, सोयाबीन आणि तुरदाळ या महत्वाच्या पिकांच्या उत्पादनात जिल्हयाचे नावलौकिक देशभर आहे.आता विकेल ते पिकेल धोरणांतर्गत संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियान या संकल्पनेवर आधिरित लातूर शहरातील विवेकानंद चौक भागात शेतकरी ते ग्राहक भाजीपाला विक्री चा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करण्यात आले असून शहरातील इतर 5 ठिकाणी आणि जिल्हयाभरात प्रत्येक तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या रयत बाजारांना सुध्दा अतिशय चांगला प्रतिसाद मिळेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्री. देशमुख जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देताना म्हणाले की, लातूर शहरात आणि जिल्हयात रयत बाजारात आणले जाणारे फळे आणि भाज्या रसायनमुक्त असणार म्हणून ते जास्त दिवस ठेवता येणार नाही. त्यामुळे  फळभाज्या, खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी  महानगर पालिका आणि जिल्हा प्रशासनाने फळे आणि भाज्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग आणि साठवण केंद्र उभारण्याकडे लक्ष दयावे. जेणेकरुन शेतकऱ्यांच्या मालाला भरपूर न्याय मिळेल तसेच अशा उद्योगांना चालनाही मिळेल. विक्री न झालेले व शिल्लक राहिलेल्या फळे व भाज्यांना प्रक्रीया केंद्रामध्ये पाठविण्याची व्यवस्था करण्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगर पालिका आणि कृषि विभागाने नियोजन करावे. पालकमंत्री पुढे म्हणाले की, केरळ राज्यात फळे आणि भाजी पाल्यांना हमी भाव देण्यात येत आहे.याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही फळे आणि भाजी पाल्यांना हमीभाव मिळावा यासाठी मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्याचे त्यांनी यावेळी म्हणाले.

लातूर शहरातील अनेक नागरिक मोठया मॉल आणि सूपर मार्केटमधून फळे आणि भाजीपाला विकत घेतात.याबाबी संबंधितांनी अशा सूपर मार्केट आणि मॉलच्या व्यवस्थापनाशी चर्चा करुन शेतकऱ्यांचा हा माल त्या ठिकाणी विक्रीला देण्यासाठी नियोजन करावेत. तसेच रयत बाजारातील नोंदणीकृत शेतकऱ्यांनी आपली फळे आणि भाजीपाला नागरिकांना घरपोच देता येईल याबाबतही विचार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

यावेळी महानगर पालिका महापौर विक्रांत गोजमगुंडे , जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनीही आपली  मनोगते व्यक्त केली. तसेच यावेळी औसा तालुक्यातील नागरसोगा येथील मालनबाई  राऊत या शेतकरी महिलेनेही शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यांनी अडीच एकर शेतीतून 14 प्रकारच्या वेगळा भाजीपाला विकून स्वतः बाजारांमध्ये विकत या एकत्रित रित्या 15 महिलांना एकत्र करून बजरंग बली सेंद्रिय शेतकरी गट स्थापन करून या गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या महाल स्वतः बाजारात विक्री करतात त्यामुळे आर्थिक नफा जास्तीचा आहे रिसॉर्ट बँक मध्ये त्यांचा प्रतिनिधी आहे इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात त्यांनी या ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली शेतकऱ्याचा माल विक्रीमध्ये मदत केली त्याबद्दल त्यांनी अमित  देशमुख यांचे स्वागत केले.

प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते रयत बाजारचे उद्घाटन करण्यात आले यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी आस्थेवाईक पणे विचारपूस व चर्चा केली आणि भाजीपाल्यांच्या स्टॉलवर भेटी दिल्या.या बाजारात आण्णांचे टरबूज, बाभळगावची शिमला मिर्ची आणि हरंगुळ येथील काळे गहू विशेष आकर्षण ठरले. हरंगूळ खूर्द येथील मनोहर भूजबळ यांचा काळा गहू हा -ह्दय रोगावर गूणकारी व सेंद्रीय गूळ, आकर्षक रंगीबेरंगी ढोबळी मिरची, अण्णाचे टरबूज, हादग्याची फूले, जेवळीतील पूनम सरवदे या महिला शेतक-यांनी सेंद्रीय खाद्यतेलं, चाकूरची पपई,पालक, मिरची पत्तागोबी भोपळा काकडी बटाटे वांगे कोथिंबीर मटकी टोमॅटो गाजर सिमला कांदा शेवगा दोडका लसूण वाटाणा या भाज्या याशिवाय सेंद्रिय गूळ टरबूज पपई अंजीर पेरू इत्यादी फळे सेंद्रिय अन्नधान्य डाळी मसाले आवळा कॅन्डी यासारखी सर्व घरी आवश्यक असणारी जीनसं अंदाजित अडीच टन शेतीमाल वेगळा किमतीसह साधारणतः तीन ते सव्वा तीन लाख रुपयापर्यंत विक्री झाला आज उद्घाटनानंतर एवढी विक्री झाली असून उद्यापासून नेहमी दररोज सकाळी सहा ते नऊ या वेळेत हा बाजार खुला राहील यापुढेही शेतकरी संख्या आणि भाजीपाला सुद्धा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही 75 ते 80 शेतकऱ्यांनी नोंदणी करून इतका मालविक्री केला.

यावेळी आमची जान आमची शान या लोकगीताचे लोकार्पण पालकमंत्री  व मान्यवरांच्या हस्ते झाले. या लोकगीताचे निर्माते प्रवीन नवाडे, संगीत आणि आवाज मिलींद धनेगावकर यांनी दिले तर जेपीजी हलगरकर यांनी लिहीले.या प्रसंगी उपस्थितांनी या गीताचा आनंद घेतला आणि मान्यवरांकडून दादही मिळवली.

कार्यक्रम यशस्वीततेसाठी आत्माचे सर्व तालुका तंत्र व्यवस्थापक, प्रापण तज्ञ शिवाजी राऊत, कृषी विशेषज्ञ श्रीराम हेलाले, संगणक रुपरेषक बालाजी भोसले, कृषि सहायक विशाल झांबरे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि सहायक सूर्यकांत लोखंडे तर आभार आर.एस. पाटील यांनी केले.