Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

मातृ वंदना योजनेतून मातांना मिळतो ५ हजार रुपयांचा लाभ

अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसुतीनंतर क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यांच्यासाठी यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात लागू केली आहे.

योजनेची वैशिष्ट्ये

१.  राज्यात 1 जानेवारी 2017 रोजी अथवा त्यानंतर कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील.

२.  ही योजना एकवेळ आर्थिक लाभाची असून पहिल्या जिवीत अपत्यापुरतीच मर्यादित असून या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल.

३.  नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास त्या टप्प्यापुरताच लाभ लागू राहील.

४.  या योजनेत दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश असला तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

योजनेचा लाभ कसा मिळेल

१.  पात्र लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत गर्भवती महिलांना नोंदणी करणे आवश्यक आहे.

२.  उक्त लाभासाठी महिलेचे व तिच्या पतीचे सहमती पत्रे, दोघांचीही आधार संबंधित माहिती (आधार) आणि लाभार्थी महिलेचे आधार संलग्न बँक खाते अथवा पोस्ट खाते क्रमांक तसेच तिचे / पतीचे / कुटुंबातील सदस्याचा मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.

३.  प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या लाभाची रक्कम लाभार्थी महिलेच्या आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफीसमधील खात्यात एकूण रुपये 5000/- रुपयांची रक्कम तीन हप्त्यात जमा केली जाणार आहे.

४.  पहिला हप्ता रुपये 1000/- हा मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जाईल.

५.  दुसरा हप्ता रुपये 2000/- हा किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जाईल.

६.  तिसरा हप्ता रुपये 2000/- हा प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकाचे प्राथमिक लसीकरणाचा जन्मत: एक मात्रा बीसीजी, ओपीव्ही, हिपॅटॅटीस बी तसेच पेन्टाव्हॅलेन्टचे 3 व ओपीव्हीच्या 3 मात्रा अथवा समतूल्य लसीकरण पूर्ण झाल्यावर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जाईल.

७.  लाभार्थी महिलेची शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास त्यांना जननी सुरक्षा योजनेअंतर्गत रुपये 700/- (ग्रामीण भागात) व रुपये 600/- (शहरी भागात ) लाभ लागू राहील

योजनेसाठी यांना करा संपर्क

अंगणवाडी सेविका किंवा आशा कार्यकर्तीच्या माध्यमातून किंवा जवळच्या सरकारी दवाखान्यात

Exit mobile version