गेल्या 24 तासात दिल्या 36 लाख मात्रा
देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या देण्यात आलेल्या एकूण मात्रांनी आज 9.43 कोटीचा टप्पा पार केला. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार भारतात 14,28,500 सत्राद्वारे 9,43,34,262 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. लसीकरण अभियानाच्या 83 व्या दिवशी (8 एप्रिल 2021) लसीच्या 36,91,511 मात्रा देण्यात आल्या.. 49,416 सत्राद्वारे 32,85,004 लाभार्थींना पहिली मात्रा आणि 4,06,507 लाभार्थींना दुसरी मात्रा देण्यात आली.
HCWs | FLWs | Age Group 45-60 years | Over 60 years |
Total |
||||
1st Dose | 2nd Dose | 1st Dose | 2nd Dose | 1st Dose | 2nd Dose | 1st Dose | 2nd Dose | |
89,74,511 | 54,49,151 | 98,10,164 | 45,43,954 | 2,61,03,814 | 5,23,268 | 3,75,68,033 | 13,61,367 | 9,43,34,262 |
जागतिक स्तरावर दैनंदिन मात्रांचे प्रमाण लक्षात घेता भारत दर दिवशी सरासरी 37,94,328 मात्रा देत असून अद्यापही सर्वोच्च स्थानावर आहे. भारतात दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ जारी आहे.गेल्या 24 तासात 1,31,968 नव्या रुग्णांची नोंद झाली.
महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या वाढती असून नव्या रुग्णांपैकी 83.29% रुग्ण या 10 राज्यात आहेत.
Date: 8th April,2021 | |||||||||
HCWs | FLWs | 45 to <60 years | Over 60 years | Total Achievement | |||||
1stDose | 2ndDose | 1stDose | 2nd Dose | 1stDose | 2nd Dose | 1stDose | 2nd Dose | 1stDose | 2ndDose |
5,792 | 28,897 | 41,462 | 1,26,651 | 21,67,078 | 51,231 | 10,70,672 | 1,99,728 | 32,85,004 | 4,06,507 |
महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 56,286 नव्या रुग्णांची नोंद झाली.
भारतात आज उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 9,79,608 आहे. ही देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 7.50% आहे.
देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 73.24% महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक,उत्तर प्रदेश आणि केरळ या पाच राज्यांमध्ये आहेत. देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 53.84% महाराष्ट्रात आहेत.
भारतात एकूण 1,19,13,292 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 91.22% आहे.
गेल्या 24 तासात 61,899 रुग्ण कोरोनातून बरे झाले.
गेल्या 24 तासात 780 रुग्णांचा मृत्यू झाला.
यापैकी 92.82% मृत्यू दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 376 जणांचा मृत्यू झाला.