कोविड प्रतिबंधक लसीच्या 6.1 कोटीपेक्षा जास्त मात्रा

महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू  आणि गुजरात या सहा राज्यात दैनंदिन रुग्णांची वाढती संख्या सुरूच आहे. नव्या रुग्णांपैकी 78.56% रुग्ण या सहा राज्यात आहेत.

गेल्या 24 तासात 56,211 नव्या रुग्णांची नोंद झाली.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 31,643 नव्या रुग्णांची नोंद झाली. पंजाबमध्ये  2,868 आणि कर्नाटकमध्ये 2,792 नव्या रुग्णांची नोंद झाली.

दहा राज्यात दैनंदिन रुग्णाचा आलेख चढा राहिला आहे.

भारतात आज एकूण  सक्रीय रुग्णसंख्या 5,40,720  आहे. भारतातली सध्याची सक्रीय रुग्ण संख्या ही एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 4.47% आहे.

देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 79.64% महाराष्ट्र,केरळ, पंजाब, कर्नाटक, आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये आहेत. देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 62 %  रुग्ण महाराष्ट्रात  आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार भारतात 10,07,091 सत्राद्वारे 6.11 कोटीहून अधिक (6,11,13,354) लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

यामध्ये 81,74,916 आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी (पहिली मात्रा ), 51,88,747  आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी (दुसरी मात्रा), 89,44,742  आघाडीवर राहून काम करणारे कर्मचारी (पहिली मात्रा ), 37,11,221  आघाडीवर काम करणारे कर्मचारी (दुसरी मात्रा),  45 वर्षावरील आणि सह व्याधी असणारे 68,72,483  (पहिली मात्रा),405 (दुसरी मात्रा) तर साठ वर्षावरील 2,82,19,257 (पहिली मात्रा), 1 583 लाभार्थी  (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.

लसीकरण अभियानाच्या 73  व्या दिवशी (29  मार्च 2021) लसीच्या 5,82,919 मात्रा देण्यात आल्या.. 14,608  सत्राद्वारे 5,51,164 लाभार्थींना पहिली मात्रा  आणि 31,755 लाभार्थींना दुसरी मात्रा देण्यात आली.

भारतात एकूण 1,13,93,021 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 94.19%. आहे.

गेल्या 24 तासात 37,028 रुग्ण कोरोनातून बरे झाले.