देशभरात 23 कोटींहून अधिक कोविड चाचण्या

लसींचे 3.7 कोटींहून अधिक डोस दिल गेले

देशभरात करण्यात आलेल्या कोविड चाचण्यांची संख्या आता  23 कोटींहून अधिक झाली आहे.आजच्या तारखेपर्यंत 23,03,13,163 चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशाचा एकूण पॉझिटिव्हीटी  दर  सातत्याने 5% हून कमी राहिला आहे.आज हा दर 4.98% इतका आहे.

भारतात दररोज दर दहा लाख लोकसंख्येच्या प्रमाणात  होणाऱ्या चाचण्या 140 पेक्षा अधिक असून आज दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 3.37% इतका राहिला.

दुसऱ्या बाजूला भारत अतिशय वेगाने 4 कोटी लोकांचे लसीकर पूर्ण करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार 3,71,43,225 लसींच्या मात्रा 6,15,267 सत्रांमधून देण्यात आल्या.

यात 75,68,844  आरोग्य कर्मचारी (एचसीडब्ल्यूज ,पहिला डोस) 46,32,94 आरोग्य कर्मचारी (एचसीडब्ल्यूज, दुसरा डोस), 77,16,084 पहिल्या फळीतील कोविड योध्दे ( एफसीडब्ल्यूज ,पहिला डोस)19,09,528 पहिल्या फळीतील कोविड योध्दे (एफसीडब्ल्यूज , दुसरा डोस ), 24,57179  सहव्याधी असलेले 45 वर्षांवरील लाभार्थी (पहिला डोस) आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या  1,28,58,680  लाभार्थ्यांचा समावेश आहे.

लसीकरण मोहिमेच्या आजच्या 61व्या दिवशी (17  मार्च 2021 )20 लाखांहून ( 20,78,719) अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

एकूण 17,38,750 लाभार्थ्यांना 28,412 सत्रांद्वारे लसीचा पहिला डोस देण्यात आला (एचसीडब्ल्यूज आणि एफसीडब्ल्यूज)आणि 3,39,969 एचसीडब्ल्यूज आणि एफसीडब्ल्यूज यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.

भारतातील  एकूण सक्रीय रुग्णभार 2,52,364 वर पोहोचला असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या  2.20% इतकी आहे.गेल्या 24 तासांत एकूण सक्रीय  रुग्णसंख्येत 17,958 रूग्णांची नोंद होऊन त्यात अधिक भर पडली.

खालील आलेख भारतातील रुग्णांची सद्यस्थिती  देत आहे.

महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या पाच राज्यांत दैनंदिन कोविड रुग्णसंख्येत सातत्याने वाढ नोंदली जात आहे. 79.54% नवीन रुग्ण या पाच राज्यांत आढळून आले आहेत.

गेल्या 24 तासांत 35,871  नव्या रुग्णांची नोंद झाली.

महाराष्ट्रात  सर्वाधिक म्हणजे 16,620  इतक्या  दैनंदिन  रुग्णांची नोंद झाली   आहे.(एकूण रुग्णांपैकी 63.21% इतक्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे) त्याखालोखाल केरळमध्ये 1,792 तर पंजाबमध्ये 1,492 नव्या रुग्णांची नोंद झाली.

  

आठ राज्यांतील  रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहेत. यात महाराष्ट्र, तामिळनाडू,पंजाब,मध्यप्रदेश, दिल्ली,गुजरात, कर्नाटक आणि हरीयाना या राज्यांचा समावेश आहे.

केरळमध्ये गेल्या महिन्यापासून रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याची नोंद होत आहे.

भारतात आज कोविडमुक्त  झालेल्यांची एकूण संख्या 1,10,63,025 आहे. देशातील  रूग्णमुक्तीचा राष्ट्रीय दर 96.41% इतका आहे. गेल्या 24 तासांत 17,741 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत 172 जणांचा मृत्यु झाल्याची नोंद झाली आहे.

यापैकी पाच राज्यांत 84.88%  (नवीन)  रुग्णांचा मृत्यू  झाला. महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यु (84) झाले.गेल्या 24 तासांत पंजाबमध्ये त्याखालोखाल 35 दैनंदिन मृत्यूंची तर केरळमध्ये 13  मृत्यूंची नोंद झाली आहे.

एकूण मृत्यु दर 1.5% पेक्षा (1.39%) कमी आहे तसेच तो सातत्याने खाली येत आहे.

गेल्या 24 तासांत  18  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत  मिळून कोविड-19 मुळे एकाही मृत्यूची नोंद  झालेली नाही.यात राजस्थान, आसाम, चंदीगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओदिशा, झारखंड, पुडुचेरी, लक्षद्वीप, सिक्कीम, लडाख( केंद्रशासित प्रदेश),मणिपूर, दादरा आणि नगरहवेली ,दीव आणि दमण ,मेघालय, नागालँड, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह तसेच अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.