मॉन्सून आणखी सक्रीय; मुंबईत मुसळधार; कोकणात अतिवृष्टीचा इशारा

मुंबई, ९ : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबईत पोचलेला मॉन्सून कोकणासह राज्यातील काही भागात आणखी सक्रीय झाला आहे. मात्र जो पर्यंत ७५ ते १०० सेमी पाऊस पडून वाफसा येत नाही तो पर्यंत शेतकरी बांधवांनी खरीप पेरणीची घाई करू नये, असा इशारा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिला आहे.

मुंबईत रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी साचले आहे. रेल्वे रुळांमध्ये पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे.

मुंबईतल्या पश्चिम उपनगर अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव दमदार पाऊस सुरू आहे. तर पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु आहे. तर नवी ठाणे, रायगडलाही मुसळधार पावसाने झोडपले आहे.
हवामान विभागाकडून कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. मुंबईत १० जून ते १२ जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
त्यामुळे सतर्क राहण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.तसेच राज्य सरकारनेही जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
दिनांक 09 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व परभणी जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 08 जून रोजी मराठवाडयातील सर्व जिल्हयात तर दिनांक 09 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व परभणी जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी मौसमी पाऊस 75 ते 100 मिमी झाल्याशिवाय पेरणी करू नये.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 13 जून ते 19 जून, 2021 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.