Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

सोमवारपासून सर्वात कमी कालावधीचे पावसाळी अधिवेशन

सोमवारपासून होणारे दोन दिवसाचे विधीमंडळाचे अधिवेशन हे आत्तापर्यंत सगळ्यात कमी कालावधीचे अधिवेशन ठरणार आहे. हे अधिवेशन आतापर्यंत दोन वेळा पुढे ढकलण्यात आले, २२ जून आणि ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात हे अधिवेशन घेण्याचे ठरले होते, त्यापूर्वी विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कोरोना  संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गुंडाळण्यात आले होते. गेल्या पाच महिन्यापासून राज्यात टाळेबंदी सुरू आहे आणि आता टप्प्याटप्प्याने ही टाळेबंदी उठवली जात आहे.

कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत  सव्वा आठ लाख पेक्षा जास्त जणांना बाधा झाली असून २५,१९५ रुग्ण आत्ता पर्यंत दगावले आहेत तर सुमारे सहा लाख रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे गृह निर्माण मंत्री, जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे, पशु आणि मत्स्य विकास मंत्री अस्लम शेख यांना ही कोरोनाची लागण झाली होती, तर नुकतेच पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना नेमके अधिवेशनाच्या आधीच दोन दिवस कोरोना संसर्ग झाला आहे. ७सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या या पावसाळी अधिवेशासाठी आमदारांची बसण्याची व्यवस्था देखील प्रथमच अभ्यागत आणि विद्यार्थी कक्षात केली आहे.

शनिवार आणि रविवार म्हणजे ५आणि ६सप्टेंबर दरम्यान सगळे आमदार आणि अधिवेशन वार्तांकन करणारे पत्रकार तसेच विधानभवन कर्मचारी यांना कोरोना टेस्ट द्यावी लागत आहे, आमदारांना फेस मास्क आणि शिल्ड असे विशेष किट देण्यात येणार आहे. आमदारांच्या स्वीय सहाय्यक म्हणजे पी .ए. ना विधानभवनात प्रवेश नाही, त्यांची व्यवस्था समोरील वाहन तळा च्या जागेत केली आहे. दोन दिवसाच्या या अधिवेशनात पुरवणी मागण्या, आणि विधेयके असणार आहेत. पुरवणी मागण्या मतदान घेऊन संमत केल्या जातील. प्रश्नोत्तरांचा तास, लक्षवेधी सूचना आणि चर्चा या अधिवेशनात नसतील. असे विधान कामकाज मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

सोमवारी, विधिमंडळाच्या  दोन्ही सभागृहात देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. त्यानंतर पुरवणी मागण्या आणि अध्यादेश पटलावर ठेवण्यात येतील, मंगळवारी या पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान होईल. या अधिवेशनात अंतिम वर्षाच्या परीक्षा, कोविड १९ची राज्यातील स्थिती आणि सुशांत सिंग राजपूत केस यावर विरोधक आवाज उठवण्याची शक्यता आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ८ लाख ६३ हजार ६२ वर पोहचली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्याचं पावसाळी अधिवेशन येत्या ७ आणि ८सप्टेंबर रोजी होणार आहे. या अधिवेशनात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. पावसाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात प्रेक्षकांना प्रवेश नाकारला जाणार आहे तर आमदारांच्या पीएना देखील प्रवेश नाकारण्यात आला आहे.

शिवाय मंत्रीमंडळापासून सर्वच कर्मचारी अधिकारी वर्गाला कोरोना टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. तशी व्यवस्था विधान भवन परिसरात करण्यात आली आहे मात्र नियोजन शून्य कारभारामुळे गर्दी पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून या चाचणी दरम्यान करोनाचा संसर्ग वाढणार तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. विधानसभेचे अधिवेशन दोन दिवसांवर आलं आहे. अशात विधानसभा अध्यक्षांचाच अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वाखाली  अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे. ७ आणि ८ सप्टेंबरला विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत अनेक आमदारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दोन दिवसीय अधिवेशनात आवश्यक ती खबरदारी घेतली जाणार आहे.

Exit mobile version