मोबाईल प्रीपेड २०२२ मध्ये अधिक महाग?

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, एअरटेल, VI आणि रिलायन्स जिओसह भारतातील जवळजवळ सर्व प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी देशातील त्यांच्या प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या. प्लॅनच्या किमती वाढल्याबद्दल मोबाईलधारक आधीच चिंतेत असताना २०२२ मध्ये प्रीपेड टॅरिफच्या किमती पुन्हा वाढू शकतात.

२०२२ मध्ये प्रीपेड अधिक महाग?
एअरटेलचे सीईओ गोपाल विट्टल यांनी अलीकडेच एअरटेलच्या तिसर्‍या तिमाही दरम्यान भारतात चालू असलेल्या टॅरिफ परिस्थितीबद्दल माहिती दिली त्यांनी हे स्पष्ट केले की एअरटेल देशात दरवाढीच्या लाटेचे नेतृत्व करण्यास मागेपुढे पाहणार नाही. मात्र, पुढील दरवाढ सध्या सुरू होणार नसून तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

एअरटेलच्या महसुलात घट :
भारती एअरटेलने मंगळवारी तिच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 2.8 टक्क्यांनी घसरण नोंदवली असून ती 2021 च्या तिसर्‍या तिमाहीत 830 कोटी रुपये झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत 854 रुपये होती. या तिमाहीत भारती एअरटेलचा एकत्रित महसूल 12.6 टक्क्यांनी वाढून 29,867 कोटी रुपये झाला आहे. विट्टल यांनी दावा केला की 2022 मध्ये त्यांचा ARPU (सरासरी महसूल प्रति वापरकर्ता) 200 रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. भारतातील Airtel चे 4G ग्राहक वार्षिक 18.1% ने वाढून 195 दशलक्ष झाले आहेत. वर्षभरापूर्वी त्याची संख्या १६.५६ कोटी होती.

आता डेटा वापर कमी :
विट्टल यांच्यामते, लोक एका महिन्यात 17GB किंवा 18GB पेक्षा जास्त डेटा वापरू शकत नाहीत, ज्यामध्ये गेल्या वर्षभरात सुमारे 11.7 टक्के वाढ झाली आहे. तसेच, शाळा, कार्यालये आणि अशा अनेक संस्था आता सुरू होत असल्याने, बँडविड्थचा वापर देखील एकाच वेळी कमी होत आहे.