रेल्वेच्या माध्यमातून कल्याणकारी योजनांचा संदेश

रेल्वेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. “मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचे काम उत्कृष्टपणे सुरु असून रेल्वेच्या डब्यांवर शासकीय योजनांची माहिती पोहोचवण्याचा उपक्रम अत्यंत चांगला आहे,” अशा प्रतिक्रिया कोल्हापूर येथील ‘श्री शाहू महाराज टर्मिनल’ या रेल्वे स्थानकावरील ऋतुजा चोपडे यांच्यासह अन्य प्रवाशांनी व्यक्त केल्या.

राज्य शासनाने या दोन वर्षांत घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयाची व लोकोपयोगी योजनांची माहिती रेल्वेच्या डब्यांवर लावण्यात आली आहे. राज्यात पाच एक्सप्रेस गाड्यांद्वारे हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने सरकारच्या विविध विकास कामांवर तयार करण्यात आलेल्या लोककल्याणाचा संदेश लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांद्वारे देण्यात येत आहे.

कल्याणकारी योजनांचा संदेश

राज्य शासनाच्या वतीने ‘आपला महाराष्ट्र, आपले सरकार’ या टॅग लाईन द्वारे लोकोपयोगी योजनांचा संदेश रेल्वे गाड्यांच्या डब्यावर देण्यात आला आहे. शेती, क्रीडा, सामाजिक न्याय, आरोग्य, महिला व बाल विकास विभागाच्या योजनांचा यात समावेश आहे.  ‘दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची’ हा संदेश देण्यात येत आहे.

कर्जमुक्ती.. चिंतामुक्त शेतकरी, माझी वसुंधरा, मोफत सातबारा आता दारी येणार.. ई-पीक पाहणी नोंदणीही करता येणार..  महिला सक्षमीकरण- कुटुंबातील महिलांच्या नावे घर असल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्क्यांची सूट, कौशल्य विकास-बेरोजगारांना रोजगार, विक्रमी लसीकरण.. कोरोनापासून संरक्षण, कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी पाच लाखाची मुदत ठेव योजना, जिथे ‘सारथी’ तिथे प्रगती, क्षमता आणि कौशल्य वृद्धीसाठी शिक्षण- प्रशिक्षण, आपद्ग्रस्तांना मदत, कापूस खरेदीसाठी मदत.. आदी अनेक निर्णय व योजनांची माहिती रेल्वेच्या माध्यमातून देण्यात येत आहे.