Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

भारत आणि फिजी यांच्यात कृषी आणि संलग्न क्षेत्रात सामंजस्य करार

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि फिजीचे कृषी, जलमार्ग व पर्यावरण मंत्री डॉ. महेंद्र रेड्डी यांनी आज झालेल्या आभासी बैठकीत भारत आणि फिजी यांच्यात कृषी आणि संलग्न  क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करारावर  स्वाक्षरी केली.

यावेळी  तोमर म्हणाले की, ‘वसुधैव कुटुंबंब’ या भावनेवर भारताचा विश्वास आहे.  कोरोना महामारीच्या काळातही भारताने सर्व देशांना समान भावनेने मदत केली आहे

फिजीचे मंत्री डॉ. रेड्डी यांनी सामंजस्य कराराबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की दोन्ही देश एकमेकांमधील परस्पर संबंध याच समान भावनेने  कायम ठेवतील.

सामंजस्य करारात दुग्ध उद्योग विकास, तांदूळ उद्योग विकास, कंदमुळाचे वैविध्यकरण  , जलसंपदा व्यवस्थापन, नारळ उद्योग विकास, अन्न प्रक्रिया उद्योग विकास, कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन उद्योग विकास, कृषी संशोधन, पशुसंवर्धन, कीड आणि रोग, लागवड, मूल्यवर्धन आणि विपणन, कापणी आणि दळणे , पैदास व कृषी विज्ञान या क्षेत्रांमध्ये सहकार्याची तरतूद आहे.

Exit mobile version