Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

लस घेतली नसेल; तरी दहावी, बारावीची परीक्षा देता येणार

पुढील महिन्यात होऊ घातलेल्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत राज्य परीक्षा मंडळाने संदिग्धता दूर केली असून लस न घेतलेले किंवा एकच डोस घेतलेल्यांना परीक्षेस बसू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला देता येणार की नाही यावरून संभ्रम निर्माण झाला होता. आता सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेस बसता येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यात लस न घेतलेले तसेच एकच डोस घेतलेल्यांचा समावेश असेल. लसीकरण ही परीक्षेस बसण्यासाठी अट नसेल हे मंडळाने स्पष्ट केले असून लसीकरणाच्या स्थिती कोणतीही असली तरी ते परक्षा देऊ शकणार असल्याचे मंडळाच्या पुणे विभागाच्या सचिव अनुराधा ओक यांनी कळविले आहे. याबाबत मंडळाने लसीकरण नसल्यास परीक्षेला बसता येणार नाही अशा कोणत्याही सूचना दिल्या नव्हत्या, तसेच लसीकरणाची अट परीक्षेसाठी नसेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात लसीकरणावरून मेसेज व्हायरल होत होते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांत संभ्रम निर्माण झाला होता. माझी मुलगी नुकतीच कोरोनामुक्त झाली होती. तिला पुढील तीन महिने लस देऊन असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे ती लस न घेतल्यामुळे तिला परिक्षेला बसता येईलल की नाही याबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र, मंडळाच्या या निर्णयामुळे मनातील ही भीती दूर झाली आहे, असे एका पालकाने सांगितले.

तर बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यात आले आहे. त्यवर लसीकरणाबाबत कोणतीही सूचना नाही. पूर्वीच्या परीक्षांच्या वेळीच्या कोरोनाशी संबंधित सूचनाच त्यावर आहेत असे एका मुख्याध्यापकाने सांगितले. सध्या १५ ते १८ या वयोगटातील किशोरांचे लसीकरण सुरू आहे. मात्र, कोव्हॅस्किनच्या कमतरतेमुळे अनेक मुलांचा दुसरा डोस अद्याप झालेला नाही. त्यामुळे पालकांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावऱण होते. ते आता दूर झाले आहे.

Exit mobile version