पुणे, ता. 9 : येत्या 11 ते 13 जुलै दरम्यान मराठवाडा आणि मध्यमहाराष्टÑ, कोकण परिसरात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे येथील हवामान केंद्राने वर्तविली आहे.
उद्या 10 जुलै रोजी तसेच 11 ते 13 जुलै रोजी कोकण, गोवा, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पूर्व मध्य अरबी समुद्र -कर्नाटक किनारपटटीवरील कमी दाबाचा पटटा कायम असल्याचे आज सकाळी दिलेल्या वृत्तात हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान मागील 24 तासांत मराठवाडा, मध्य महाराष्टÑ आणि विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याचे या वृत्तांतात म्हटले आहे.