खतांच्या संतुलित वापर आवश्यक

मनसुख मांडवीय यांची एन.एफ.एल. पानिपत प्रकल्पाला भेट

मांडवीय यांनी सध्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला आणि सध्याच्या महामारीच्या परिस्थितीत एनएफएल किसान चमूने दिलेल्या उत्कृष्ट सेवांबद्दल त्यांचे अभिनंदन केले. कोविड -19 मुळे लावलेल्या टाळेबंदी दरम्यान कडक निर्बंध असूनही एनएफएलच्या विक्रीत 71% वाढ झाली आहे.

जास्तीत जास्त दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी व मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी मृदा परीक्षण करणे आवश्यक आहे असे मंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्यांनी फिरत्या मृदा परीक्षण प्रयोगशाळेस भेट देऊन खतांच्या संतुलित वापरावर विशेष लक्ष केंद्रित करायला अधिकाऱ्यांना सांगितले. बैठकीनंतर मांडवीय यांनी वृद्धी आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून वृक्षारोपण केले.

पानिपत प्रकल्पात आगमन झाल्यावर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र नाथ दत्त आणि संचालक (तांत्रिक) निर्लेप सिंह राय यांनी मंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्य महाव्यवस्थापक (विपणन) अनिल मोतसरा आणि पानिपत प्रकल्पाचे प्रभारी महाव्यवस्थापक, रत्नाकर मिश्रा आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पानिपत प्रकल्पात सादरीकरणाच्या माध्यमातून मंत्र्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. सादरीकरणाच्या वेळी मंत्र्यांनी खत क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक बाबींवर चर्चा केली आणि कंपनीला मार्गदर्शन केले.