महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 ठळक वैशिष्ट्ये
सेंद्रीय शेती उत्पादनात अखिल भारतात मध्यप्रदेश नंतर राज्य (22 टक्के हिस्सा) दुसऱ्या क्रमांकावर आहे. सन 2020-21 मध्ये राज्यातून 1.26 लाख मे.टन सेंद्रीय शेती उत्पादनाची निर्यात झाली.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ति योजना 2019 च्या सुरुवातीपासून दि.22 डिसेंबर, 2021 पर्यंत 31.71 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना ` 20,243 कोटी रकमेचा लाभ देण्यात आला.
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत राज्य शासनाने माहे एप्रिल, 2021 पासून ` तीन लाख रकमेपर्यंतच्या कर्जास व्याजदराचे अनुदान एक टक्क्यावरुन तीन टक्के केले आहे.
मोठ्या, मध्यम व लघु पाटबंधारे (राज्य क्षेत्र) प्रकल्पांद्वारे माहे जून, 2020 अखेर 54.15 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली असून सन 2020-21 मध्ये प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र 41.60 लाख हेक्टर (76.8 टक्के) होते.
मोठ्या, मध्यम व लघु पाटबंधारे (राज्य क्षेत्र) जलाशयांमध्ये मिळून एकत्रितपणे दि.15 ऑक्टोबर, 2020 रोजी एकूण उपयुक्त जलसाठा 33,005 दशलक्ष घनमीटर होता व तो एकूण जलसाठा क्षमतेच्या 75.2 टक्के होता.
सन 2020-21 मध्ये 0.68 लाख हेक्टर क्षेत्र नव्याने सूक्ष्म सिंचनाखाली आले आणि 84,726 पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात
` 158.23 कोटी अनुदान जमा करण्यात आले.
सन 2021-22 मध्ये माहे सप्टेंबर अखेर, वित्तीय संस्थांद्वारे ` 33,066 कोटी पीक कर्ज तर ₹ 24,963 कोटी कृषि मुदत कर्ज वाटप करण्यात आले.
सन 2021-22 मध्ये डिसेंबरपर्यंत प्राथमिक कृषि सहकारी पतपुरवठा संस्थांनी शेतकऱ्यांना एकूण ` 14,536 कोटी कर्ज वितरित केले.
माहे मार्च ते माहे मे, 2021 कालावधीत अवकाळी पाऊस, गारपिट आणि चक्रीवादळ यामुळे 31 जिल्ह्यांमधील बाधित झालेल्या सुमारे 0.91 लाख हेक्टर कृषिक्षेत्राकरीता ` 122.26 कोटी नुकसान भरपाई मंजूर केली. माहे मे, 2021 मध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे
17 जिल्ह्यांमधील बाधित झालेल्या सुमारे 0.17 लाख हेक्टर कृषिक्षेत्राकरीता ` 72.35 कोटी नुकसान भरपाई मंजूर केली.
माहे जुलै, 2021 मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे 24 जिल्ह्यांमध्ये सुमारे 4.43 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले व त्याकरीता
` 365.67 कोटी नुकसान भरपाई मंजूर केली. माहे ऑगस्ट ते सप्टेंबर, 2021 या कालावधीत राज्यातील 28 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी/ पुरामुळे बाधित झालेल्या सुमारे 48.38 लाख हेक्टर कृषिक्षेत्राकरीता ` 3,766.35 कोटी नुकसान भरपाई मंजूर केली.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दि.17 फेब्रुवारी, 2022 अखेर राज्यातील 109.33 लाख लहान व सीमांतिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात एकूण ` 18,120.23 कोटी रक्कम जमा करण्यात आली.
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत सन 2020-21 मध्ये 1.29 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना ` 16.05 कोटी रक्कम व्याज सवलत अनुदान वितरीत करण्यात आले तर सन 2019-20 मध्ये 4.26 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना ` 52.89 कोटी रक्कम व्याज सवलत अनुदान वितरीत करण्यात आले.
पशुगणना 2019 नुसार सुमारे 3.31 कोटी पशुधनासह राज्य देशात सातव्या क्रमांकावर आहे. सुमारे 7.43 कोटी कुक्कुटादी पक्ष्यांच्या संख्येसह राज्य देशात पाचव्या क्रमांकावर आहे.
सन 2020-21 मध्ये शासकीय व सहकारी दुग्धशाळांचे दैनिक सरासरी दूध संकलन अनुक्रमे 0.50 लाख लिटर व
40.43 लाख लिटर होते, तर सन 2019-20 मध्ये ते अनुक्रमे 0.96 लाख लिटर व 39.76 लाख लिटर होते.
सन 2020-21 मध्ये सागरी व गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन अनुक्रमे 3.99 लाख मे. टन व 1.25 लाख मे. टन होते, तर
सन 2019-20 मध्ये ते अनुक्रमे 4.44 लाख मे. टन व 1.18 लाख मे. टन होते.
सन 2020-21 अखेर राज्याचे वनक्षेत्र भौगोलिक क्षेत्राच्या 20.1 टक्के होते.
राज्याने तौक्ते चक्रीवादळामुळे मृत जनावरांसाठी ` 10.88 लाख, पोल्ट्री शेडच्या नुकसानीसाठी ` 3.85 लाख आणि मासेमारी बोटी व जाळ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी ` 630.53 लाख नुकसान भरपाई मंजूर केली आहे. राज्याने माहे जून, 2021 मध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे मृत जनावरांसाठी ` 10.12 लाख भरपाई मंजूर केली आहे. राज्याने माहे जुलै, 2021 मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मृत जनावरांसाठी ` 925.34 लाख, पोल्ट्री शेडच्या नुकसानीसाठी ` 13.17 लाख आणि मासेमारी बोटी व जाळ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी ` 1,101.28 लाख नुकसान भरपाई मंजूर केली आहे.