Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कोरोना रुग्णवाढीत महाराष्ट्र अग्रेसर

भारतातील दैनंदिन नवीन रुग्णांपैकी 61% रुग्णसंख्या केरळ, महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि उत्तर प्रदेश यामधील

गेल्या 24 तासात 44,489 नवीन कोविड रुग्णसंख्या नोंदवली गेली. यापैकी 60.72%  रुग्णसंख्या ही केरळ, महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांमधील आहे.

गेल्या 24 तासात, केरळात सर्वाधिक 6,491 नवीन कोविड रुग्ण नोंदवले गेले, महाराष्ट्रात त्या खालोखाल 6,159 नवीन रुग्ण नोंदवले आहेत तर दिल्लीत 5,246 रुग्ण संख्या नोंदवली आहे.

गेल्या 24 तासातील  524  कोविड मृत्यूंपैकी 60.50% हे, दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांमधील आहेत.

महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही राज्ये नवीन रुग्णसंख्या आणि दैनंदिन मृत्यूसंख्या या दोन्हीमध्ये पुढे असलेल्या  सहा राज्यामध्ये समाविष्ट आहेत. मागील 24 तासात दिल्लीमध्ये सर्वाधिक 99 तर महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे 65 आणि 51  रुग्णांचा मृत्यु झाला.

भारताची सध्याची सक्रीय रुग्णसंख्या (4,52,344) ही एकूण रुग्णसंख्येच्या 4.88% आहे. आणि सातत्याने 5% हून कमी आहे.

सक्रीय रुग्णसंख्येपैकी 65%रुग्णसंख्या  ही 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहे. याच राज्यांमध्ये जास्त नवीन रुग्ण आणि जास्त मृत्यूसंख्या आहे.

एकूण मृत्यूंपैकी 61% मृत्यू या 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

या 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील दर दशलक्षामागील संख्या राष्ट्रीय सरासरीशी (6,715) तुलना करता खालीलप्रमाणे.

या 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील मृत्यूदर (CFR) राष्ट्रीय मृत्यूदराशी (1.46%). तुलना करता खालीलप्रमाणे आहे.

भारतातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 87 लाख (86,79,138) आहे. बरे झालेल्या रुग्णसंख्येचा राष्ट्रीय दर आज 93.66%  राहिला. गेल्या 24 तासात देशात 36,367  रुग्ण बरे झाले.

15 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील रोगमुक्तीचा दर (CFR)राष्ट्रीय दरापेक्षा जास्त आहे.

20 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील रोगमुक्तीचा दर (CFR)राष्ट्रीय दरापेक्षा कमी आहे.

 

Exit mobile version