Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

संपूर्ण भारतासाठी हवामानाचा अंदाज

बंगालच्या उपसागरापासून बिहारपर्यंत उत्तर-दक्षिण दिशेने कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. बंगालच्या उपसागरावर वायव्य आणि पश्चिम-मध्य भागात ओदिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीजवळ वातावरणाच्या खालच्या स्तरात चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

  1. उत्तर भारतात बऱ्याच विस्तृत भागात( हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरयाणा, चंदीगढ आणि दिल्ली) पुढील 2 ते 3 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
  2. कोकण आणि गोव्यात पुढील 72 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुजरात राज्य, पूर्व राजस्थान आणि मध्य भारतातील बऱ्याच भागांमध्ये पुढील 48 तासात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. गुजरात राज्य आणि पूर्व राजस्थानात तुरळक भागात अतिजास्त मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे.

15 ऑगस्ट (तिसरा दिवस): विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे.

कोकण आणि गोव्यात, सौराष्ट्र आणि कच्छ मध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व राजस्थान आणि गुजरात भागात मुसळधार ते अतिमुसळधार आणि तुरळक ठिकाणी अतिजास्त मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रावर नैऋत्य आणि पश्चिम मध्य भागावर ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता.

गुजरात, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग ताशी 45-55 किमी. या काळात या भागातील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

16 ऑगस्ट ( चौथा दिवस): सौराष्ट्र आणि कच्छमध्ये तुरळक ठिकाणी अतिजास्त मुसळधार पावसासह इतर ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, गुजरातमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कोकण आणि गोव्यातही मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता.

अरबी समुद्रावर नैऋत्य आणि पश्चिम मध्य भागावर ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता.

गुजरात, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग ताशी 45-55 किमी. या काळात या भागातील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

17 ऑगस्ट (पाचवा दिवस): सौराष्ट्र आणि कच्छमध्ये तुरळक ठिकाणी अतिजास्त मुसळधार पावसासह इतर ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, गुजरातमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कोकण आणि गोव्यातही मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता.

अरबी समुद्रावर नैऋत्य आणि पश्चिम मध्य भागावर ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता .

गुजरात, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग ताशी 45-55 किमी. या काळात या भागातील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

Exit mobile version