राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकी व इतर विविध योजना आता महाडीबीटी या शासकीय पोर्टलवर देण्यात येणार असून शेतकऱ्यांना अधिकृत ग्राहक सेवा केंद्रातून किंवा स्वत: त्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येतील.
कृषी विभागाच्या उन्नती प्रकल्पांतर्गत अनुसूचित जाती-जमाती व सर्वसाधारण शेतकऱ्यांना शेतीपयोगी यंत्रे तसेच कृषी योजनांचा लाभ देण्यात येत असतो. योजनांसाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी निवड करण्यासाठी शासनाच्या महाडीबीटी या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या लक्ष्यांकापेक्षा जास्त मागणी अर्ज प्राप्त झाल्यास पडताळणी करून पात्र लाभार्थी हे शेतकऱ्यांमधून लकी ड्रॉ सोडत पध्द्तीने निवड करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कृषी कार्यालयाकडे अर्ज सादर केले आहेत त्यांनाही ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
अशा आहेत योजना :
ट्रॅक्टर, मळणी यंत्र, पेरणी यंत्र, कापणी यंत्र, रोटोव्हेटर, मिनी राईस मिल, पॉवर ट्रेलर, फवारणी यंत्र, फलोत्पादन योजनेत कांदा चाळ, पॅक हाऊस, जुन्या फळबागांचे पुनर्जीवन , फळबाग लागवड, मधुमक्षिका पालन, हरितगृह, शेडनेट, शेततळे, प्लास्टिक मल्चिंग अशा योजनांसाठी शेतकरी अर्ज सादर करू शकतात .
योजना
कृषी विभाग
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)
कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उप योजना / आदिवासी उप योजना बाह्य)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफ्तार
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
संकेतस्थळ पत्ता : https://mahadbtmahait.gov.in/