नवी मुंबई दि.03 :- लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विकास योजना राबविताना सुसंवादाचे वातावरण ठेवले तर मोठे कार्य उभे राहते. म्हणूनच कोकण विभाग शासकीय विकास योजना राबविताना राज्यात सर्व क्षेत्रात अग्रेसर असतो. असे प्रतिपादन कोकण विभागाचे महसूल आयुक्त श्री.विलास पाटील यांनी केले.
“महा आवास अभियान-ग्रामीण” अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी व कामगिरीबाबत मूल्यमापन करुन उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना आज कोकण भवन येथे “महा आवास अभियान-ग्रामीण” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळयाच्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास श्रीम.पुष्पाताई पाटील मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद ठाणे,श्रीम. वैदही विशाल वाढाण मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद पालघर, श्रीम. योगिता पारधीमा अध्यक्ष, जिल्हा परिषद रायगड,श्रीम. संजना सावंत मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग,श्री.भाऊसाहेब दांडगे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.ठाणे, श्री.सिद्धराम सालीमठ मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पालघर, श्री.डॉ.किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.रायगड, श्रीम.डॉ.इंदुराणी जाखड मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.रत्नागिरी, श्री.प्रजित नायर मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सिंधुदुर्ग, श्री.गिरीश भालेराव उप आयुक्त(विकास), श्री. मनोज रानडे उप आयुक्त (सामान्य), श्री. मकरंद देशमुख उप आयुक्त (महसुल), श्री. डी. वाय.जाधव उप आयुक्त (आस्थापना), श्री.चंद्रकांत वाघमारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पालघर , श्री.रणधीर सोमवंशी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.रायगड/प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यंत्रणा, रायगड श्री.दादाभाऊ गुंजाळ प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यंत्रणा, ठाणे, श्री.माणिक दिवे प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यंत्रणा, पालघर, श्रीम.नंदिनी घाणेकर प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यंत्रणा, रत्नागिरी श्री. राजेंद्र पराडकर प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यंत्रणा, सिंधुदुर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करतांना आयुक्त श्री.विलास पाटील म्हणाले की, कोकण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक ऊर्जा ठेवून यापुर्वीही काम केले आहे. अशीच ऊर्जा पुढेही ठेवावी. कोकण विभाग नेहमीच शासकीय योजना राबविण्याबाबत आघाडीवर असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोकणातील आदर्श व सुंदर गावे आहेत. कोकणाला नेहमीच स्वच्छतेची आवड आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक करताना आयुक्त म्हणाले की, विकास कामे करतांना जिल्हा परिषद, पंचायत समिती व महसूल विभागातील पदाधिकाऱ्यांना मोठया आव्हानाला सामोरे जावे लागते.
लोकप्रतिनिधींनी सर्व पक्षभेद, जातीपाती विसरुन एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. आगामी गणेशोत्सवाचा उत्सव लक्षात ठेवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळयांनी जागरुक राहून शासनाचे नियम पाळणे आवश्यक आहेत. लोकप्रतिनिधींनी तळागाळापर्यंत कोरोनाबाबत जनजागृती करावी. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली
सन 2020-21 या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यात दि. 20 नोव्हेंबर, 2020 रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दि.20 नोव्हेंबर, 2020 ते 5 जुन, 2021 या कालावधीत “महा आवास अभियान ग्रामीण ” राबविण्यात आले. अभियानात प्रधानमंत्री आवास योतजनेसाठी ठाणे जिल्हयाने प्रथम क्रमांक पटकावला असून संपूर्ण अभियानादरम्यान उत्कृष्ट काम केल्याबद्दल सर्वात जास्त पारितोषिके पालघर जिल्हयाला मिळालेली आहेत.
पारितोषिक प्राप्त संस्था पुढीलप्रमाणे-
प्रधानमंत्री आवास योजना- सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद प्रथम क्रमांक-जिल्हा परिषद ठाणे, द्वितीय क्रमांक-जिल्हा परिषद रत्नागिरी, तृतीय क्रमांक-जिल्हा परिषद रायगड.
राज्य पुरस्कृत आवास योजना- सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद प्रथम क्रमांक-जिल्हा परिषद रत्नागिरी, द्वितीय क्रमांक-जिल्हा परिषद सिंधुदूर्ग, तृतीय क्रमांक-जिल्हा परिषद ठाणे.
सर्वोत्कृष्ट पंचायत समिती प्रथम क्रमांक-पंचायत समिती म्हसळा जि.प.रायगड, द्वितीय क्रमांक-पंचायत समिती दापोली, जि.प.रत्नागिरी, तृतीय क्रमांक-पंचायत समिती कुडाळ, जि.प.सिंधुदुर्ग,
राज्य पुरस्कृत आवास योजना- सर्वोत्कृष्ट पंचायत समिती प्रथम क्रमांक-पंचायत समिती मोखाडा जि.प.पालघर, द्वितीय क्रमांक-पंचायत समिती तलासरी, जि.प.पालघर, तृतीय क्रमांक-पंचायत समिती वैभववाडी, जि.प.सिंधुदुर्ग,
प्रधानमंत्री आवास योजना- सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत-प्रथम क्रमांक-ग्रामपंचायत वाडोस, ता.कुडाळ, जि.प.सिंधुदुर्ग, द्वितीय क्रमांक-ग्रामपंचायत आखवणे भोम, ता.वैभववाडी, जि.प.सिंधुदुर्ग, तृतीय क्रमांक- ग्रामपंचायत सडुरे शिराळे, ता.वैभववाडी, जि.प.सिंधुदुर्ग.
राज्य पुरस्कृत आवास योजना- सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत-प्रथम क्रमांक-ग्रामपंचायत अणाव, ता.कुडाळ, जि.प.सिंधुदुर्ग, द्वितीय क्रमांक-ग्रामपंचायत मांगवली, ता.वैभववाडी, जि.प.सिंधुदुर्ग, तृतीय क्रमांक- ग्रामपंचायत उमरोली, ता.पालघर, जि.प.पालघर.
प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत आवास योजना – सर्वोत्कृष्ट वित्तीय संस्था प्रथम क्रमांक- उमेद- ता. जव्हार, जि.पालघर द्वितीय क्रमांक- उमेद- ता.वाडा, जि.पालघर तृतीय क्रमांक- उमेद- ता. डहाणू, जि.पालघर.
प्रधानमंत्री आवास योजना-शासकिय जागा उपलब्धता- प्रथम क्रमांक-तहसिलदार, ता.कल्याण,जि.ठाणे द्वितीय क्रमांक- तहसिलदार, ता.शहापूर, जि.ठाणे तृतीय क्रमांक-निरंक,
कोकण विभागातील सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत व सर्वोत्कृष्ट गृहसंकुल पुढीलप्रमाणे आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत-प्रथम क्रमांक-ग्रामपंचायत चिंचवली, ता.भिवंडी, जि.प.ठाणे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट गृहसंकुल प्रथम क्रमांक- श्रीम.सखुबाई दाजीबा निकम, ग्रा.पं. मुणगे, ता.देवगड, जि.प.सिंधुदुर्ग यांना देण्यात येणार आहेत.
अभियानातील कार्पोरेट संस्थासाठी देण्यात येणारा सर्व उत्कृष्ट जिल्हा पालघर रोटरी डिस्ट्रीक्ट 3141 “अशियाना” ता.वाडा जि.पालघर यांना घोषित करण्यात येणार आहे.
या पुरस्कार वितरण सोहळयास पंचायत समितीचे सभापती व गटविकास अधिकारी, तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी तसेच पुरस्कार प्राप्त वित्तीय संस्था आणि जागा उपलब्धतासाठी तहसिलदार व गटविकास अधिकारी उपस्थित होते. कोरोना नियम पाळून पारितोषिक वितरण कार्यक्रम करण्यात आला.