आतापर्यंत 10 राज्यात 5.66 लाख हेक्टर क्षेत्रावर राबविली टोळ नियंत्रण मोहिम

राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तरप्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये टोळ नियंत्रणासाठी 11 एप्रिल 2020 पासून सुरू करून 22 ऑगस्ट 2020 पर्यंत, 2,78,716 हेक्टर क्षेत्रावर टोळ नियंत्रण कार्यालयांकडून (एलसीओज्) कामे करण्यात आली आहेत. 22 ऑगस्ट 2020 पर्यंत, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, हरियाणा, उत्तराखंड आणि बिहार राज्य शासनाच्यावतीने टोळ नियंत्रणाची कामे 2,87,374 हेक्टर क्षेत्रात करण्यात आली आहेत.

तीन जिल्ह्यांमध्ये चार ठिकाणी काल दिवसा आणि रात्रीच्या वेळी नियंत्रण मोहीम राबविण्यात आली. गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार आणि हरियाणा या राज्यांमध्ये पिकांचे कोणतेही नुकसान झाल्याची नोंद नाही. तथापि, राजस्थानच्या काही जिल्ह्यांमध्ये पिकांचे काही किरकोळ नुकसान झाल्याची नोंद आहे.

आज (23.08.2020) राजस्थानच्या जैसलमेर, जोधपूर आणि बिकानेर जिल्ह्यात आणि गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात हे कीटत सक्रीय आहेत.

अन्न आणि कृषी संघटनेने जाहीर केलेल्या १४ ऑगस्ट २०२० च्या टोळांच्या अद्ययावत स्थितीनुसार, हॉर्न ऑफ आफ्रिका भागामध्ये किटकांच्या झुंडी कायम आहेत.  येमेनमध्ये चांगला पाऊस पडला आहे, जिथे अधिक कीटकांचे थवे आणि झुंडी तयार होण्याची शक्यता आहे. भारत – पाकिस्तान सीमेवर कीटकांचे थवे आणि झुंडी तयार होत आहेत.