घरबसल्या जाणून घ्या ईपीएफ पासबुक डाउनलोड करण्याच्या प्रक्रियेबद्दल

पीएफ खात्यात जमा झालेले पैसे भविष्य सुरक्षित करण्याचे काम करतात. तुमचेही EPFO मध्ये खाते असल्यास, तुमच्या खात्यात आतापर्यंत किती पैसे जमा झाले आहेत, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. तसेच पीएफ खात्यात जमा केलेल्या पैशावर किती व्याजदर आहे? या सर्व गोष्टींचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आज ईपीएफ पासबुकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे आपण पीएफ खात्याशी संबंधित सर्व माहिती सहज मिळवू शकता.
इंटरनेटवरून ईपीएफ पासबुक डाउनलोड करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. ईपीएफ पासबुक डाउनलोड करण्याच्या प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे…

१. सर्वप्रथम तुम्हाला EPFO च्या अधिकृत वेबसाइट https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ ला भेट द्यावी लागेल.
२. आता तुम्हाला UAN च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
३. तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला तुमचे आवश्यक तपशील टाकावे लागतील.
४. ही प्रक्रिया केल्यानंतर Get Authorization Pin या पर्यायावर क्लिक करा.
४. स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे आपण प्रविष्ट केलेल्या तपशीलांची पडताळणी करावी लागेल. ५. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
६. बॉक्समध्ये ओटीपी टाकल्यानंतर, तुम्हाला व्हॅलिडेट ओटीपी आणि सक्रिय करा हा पर्याय निवडावा लागेल.
७. तुमचा UAN सक्रिय झाल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर पासवर्डसह एसएमएस येईल.
८. हा पासवर्ड वापरून तुम्ही तुमच्या खात्यात लॉग इन करू शकता.
८. UAN सक्रिय झाल्यानंतर सुमारे 6 तासांनंतर तुम्ही तुमचे EPF स्टेटमेंट पाहू शकता.
९. पासबुक डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login.jsp ला भेट द्यावी लागेल.
१०. नंतर तुम्हाला तुमचा UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करावे लागेल.
११. यानंतर मेंबर आयडीचा पर्याय निवडून तुम्ही तुमचे ईपीएफ पासबुक सहज पाहू शकता.
हे पासबुक पीडीएफ स्वरूपात आहे. मोबाईल फोन किंवा कॉम्प्युटरवरही ते सहज डाउनलोड करू शकता.
उमंग app वरूनही वरीलप्रमाणे प्रक्रिया करून अतिशय सोप्या पद्धतीने पासबुक पाहता येते.