नाशिक, २७ : कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावसह पिंपळगाव बसवंत येथे आजही व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवले परिणामी ऐन सणासुदीला कांदा उत्पादक शेतकार्यांची कोंडी झाली. केंद्र सरकारने घाऊक व्यापाऱ्यांना २५ टन, तर किरकोळ व्यापाऱ्यांना २ टन कांदा साठवणुकीची मर्यादा लादल्याने नाशिक जिल्ह्यातील व्यापार्यांनी सोमवारपासून लिलावात सहभागी न घेण्याचा पवित्रा घेतला. मंगळवारी याप्रश्नी बोलावण्यात आलेली बैठक निष्फळ ठरली.
केंद्र सरकारने व्यापाऱ्यांवर कांदा साठवणुकीचे निर्बंध लादले. त्यामुळे आधीच खरेदी करून ठेवलेला कांदा पुढे पाठविण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे नवीन कांदा खरेदी करण्यासाठी व्यापार्यांनी असमर्थता दर्शविली. परिणामी, शेतकर्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.व्यापाऱ्यांनी शेतकरी हिताचा विचार करून लिलावात सहभागी व्हावे, यासाठी सभापती दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी व्यापार्यांची बैठक बोलावण्यात आली होती. परंतु, केंद्र सरकार जोपर्यंत साठवणुकीचे निर्बंध मागे घेत नाही तोपर्यंत लिलाव सुरू करणे अशक्य असल्याची भूमिका मांडली. त्यामुळे सदर बैठक निष्फळ ठरली.
लिलावास नकार
कांदा व्यापार्यांकडे आधीच खरेदी करून ठेवलेला माल आहे. त्यामुळे साठवणूक मर्यादेचा लादलेला निर्णय मागे घेण्याची गरज आहे. जोपर्यंत सदर निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत नवीन माल खरेदी करणार नसल्याचा पवित्रा व्यापार्यांनी घेतला आहे..मा.शरद पवार साहेब यांचा नासिक दौरा त शेतकरी व व्यापारी यांच्या समस्या मांडून लवकरात लवकर केद्र सरकार ला निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करनार असल्याचे आश्वासन दिले होते. सरकारने निर्णय घेतांना पिकवणार बळीराजाचा विचार न करता निर्णय घेतला असुन या वर्षी हातातोंडाशी आलेले पिक पावसाने गेले असुन त्याचा तरी विचार करावा कांदाला का महत्व देत आहे. सरकार माॅल मधे खरेदी करतांना कधी भाव होत नाही, मग कांदा भावाला का महत्त्व देत आहे? चार पैसे शेतकऱ्यांना मिळतात त्यातच अनेक निर्बध शेवटी शेतकरीच कचाट्यात सापडला जात आहे .
– दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बसवंत बाजार समितीसूचना दिल्या आहेत
शेतकर्यांच्या हितासाठी कांदा लिलाव सुरु करणे आवश्यक आहे. लिलावात सहभागी होण्याच्या व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांच्या अडचणींबाबत शासनाला माहिती पाठविणार आहोत.
– अभिजीत देशपांडे, सहाय्यक निबंधक, निफाड
कांद्याचे लिलाव सुरू न झाल्यास रस्ता रोको करणार
दोन दिवसांपासून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद आहेत.मात्र,यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव तात्काळ सुरू करावे,अन्यथा जिल्हाभरात रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे. बाजार समित्यांचे कामकाज बेमुदत बंद राहून पुढे बाजार समित्यांचे कामकाज सुरू झाल्यानंतर अचानक कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होऊन उलट दर घसरण्याचा धोका आहे.त्यामुळे येत्या दोन दिवसात नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे कांद्याचे लिलाव सुरळीत सुरू करावे.अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन केले जाईल,असा इशारा अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे.