Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

जमिनधारकांना मिळाला भूसंपादनावर उचित मोबदला मागण्याचा हक्क

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2020 पासून नागपूर येथे होणार आहे. शेतकरी आणि जमीन धारकांच्यासाठी महत्त्वाचे असलेले भूसंपादन मोबदला हक्क विधेयक या अधिवेशनात मंजूर झाले. या विधेयकामुळे जमीन संपादन केल्यावर उचित मोबदला मागण्याचा हक्क जमीन मालकाला मिळणार असून  त्या व्यवहारात पारदर्शकता येणार आहे.

राज्य विधीमंडळाच्या दि. 7 व 8 सप्टेंबर 2020 या कालावधीत पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात खालील विधेयके मंजूर करण्यात आली आहेत.

सन 2019 चे विधानासभा विधेयक क्र.- 37- भूमिसंपादन, पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020 (औद्योगीक विकासासाठी भूसंपादन करण्यासाठी सुलभता यावी याकरिता तरतूद) (वन विभाग) (पुर:स्थापित दि. 07.09.2020, विधानसभेत विचारार्थ 08.09.2020, विधानसभेत संमत दि. 09.2020, विधानपरिषदेत संमत दि. 08.09.2020).

Exit mobile version