कापूस तयार पण मजूर मिळेना; मजुरीही वाढली

कापूस तयार झाला, पण मजूर मिळत नाही आणि मिळाले तरी मजुरी इतकी कि ती परवडत नाही. ही समस्या सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत आहे. ऐन सणासुदीच्या काळात कापूस वेचणी त्यामुळे रखडली आहे, तर काही ठिकाणी शेतकरी एकमेकाना मदत करून कापूस वेचणी करताना दिसत आहे.

मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी कापूस लागवड करण्यात येते.आत्ता कापूस वेचणीचा हंगाम सुरू असल्याने कापूस वेचणी साठी मजूर मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे  व मिळाले तरी मनमानी भाव दयावा लागत असल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.  सद्या कापूस वेचणी हंगामाला वेग आला आहे मका सोंगणी कापूस वेचणी ही कामे एकाच वेळी आल्याने मजुरांची मोठी टंचाई भासू लागली आहे कोरोना मुळे परराज्यातील मजूर कमी संख्येने आल्यानी ही मोठी समस्या होत आहे. परिणामी कापूस वेचणी दर 5 रुपया वरून 8 रुपयावर  पोहचला आहे, काही ठिकाणी तर १० ते १२ रुपये दर मजूर मागत आहेत.

आधीच सततच्या पावसाने पिकांची मोठया प्रमाणात नुकसान झाली आहे लावलेला खर्च व येणाऱ्या उत्पन्नात या गणिताचे उत्तर वजबाकीत येणारे असतांना यात ही मजूर टंचाई व त्यासाठी लागणारे वाढीव दर नक्कीच कंबरडे मोडणारे ठरत आहे.

यावर्षी पावसाने कृपा केल्याने यावर्षी उपत्न चांगले होऊन डोक्यावरचे कर्ज उतरेल अशी आशा ही परतीच्या सततच्या पावसाने फोल ठरवली. मका, कांदा, कपाशी यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने उत्पन्नाचे सर्वच गणित चुकले होत्याचे नव्हते झाल्याने बळीराजा पुन्हा अस्मानी संकटात सापडला आहे त्यातच या मजूर टंचाई ने भर घातल्याने सणा सुदीच्या दिवसात ही बाजारापेठेत मंदी दिसून येत आहे.

अनेक शेतकऱ्यांनी फेसबुक आणि सोशल मीडियावर ही व्यथा मांडली आहे. कुणी तर कापूस वेचणी करण्यासाठी मजूर पाहिजे, अशी जाहिरातहि दिली आहे.