‘उमंग’ म्हणजेच, नव्या युगातील प्रशासनासाठीचे एकीकृत मोबाईल ॲप्लिकेशन (UMANG) च्या माध्यमातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO)च्या ग्राहकांना कोविड आजाराच्या संकटकाळात त्यांच्या घरूनच विनासायास सेवा मिळाली आहे.
सध्या प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांना उमंग ॲपच्या माध्यमातून इपीएफओ च्या 16 विविध सेवा मिळत आहेत. या सेवा मिळवण्यासाठी त्यांना UAN (युनिव्हर्सल अकाऊन्ट नंबर) आणि त्यांचा मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. उमंग ॲपच्या माध्यमातून सदस्यांना कोविडच्या काळात सेवा मिळत आहेत.
या ॲपवरुन आपल्या निधीसाठी दावा करु शकतात, दावा मंजूर होण्याच्या प्रक्रीयेचा पाठपुरावा करु शकतात. कोविड-19 च्या काळात म्हणजे एप्रिल ते जुलै 2020 मध्ये, उमंग ॲपवरुन 11.27 लाख दावे केले गेले. कोविडपूर्वीच्या काळाच्या तुलनेत यात 180% टक्के वाढ आहे. डिसेंबर 2019 ते मार्च 2020 या कालावधीत 3.97 लाख दावे करण्यात आले.
उमंग ॲपवरुन मिळणारी सर्वात लोकप्रिय सेवा, म्हणजे सदस्यांचे पासबुक त्यांना बघता येते. ऑगस्ट 2019 ते जुलै 2020 या काळात 27.55 कोटी वेळा सेवेचा लाभ घेतला गेला.
उमंग चा वापर करणाऱ्यांपैकी सुमारे 90% वापरकर्ते EPFO चे सदस्य आहेत.