यंदाच्या खरीप हंगामात धान आणि तेलबियांच्या पेरणीत वाढ

गेल्या हंगामाच्या तुलनेत पेरणीक्षेत्रात वाढ, इतर खरीप पिकांच्या क्षेत्रातही वाढ

कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कोविडच्या काळात कृषीक्षेत्रातील कामे सुरु ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत झालेल्या पेरण्या समाधानकारक आहेत. या पेरण्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :-

धान/भातपिक:

यंदा 321.79 लाख हेक्टर क्षेत्रावर धान/भातपिकाची लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी हे क्षेत्र 274.19 लाख हेक्टर इतके होते.  म्हणजेच यंदा 47.60 लाख हेक्टर  अधिक क्षेत्र लागवडीखाली आहे.

डाळी :

या हंगामात 119.59 लाख हेक्टर जमीनीवर डाळींची लागवड करण्यात आली. गेल्यावर्षी हे क्षेत्र 114.77 लाख हेक्टर इतके होते. म्हणजेच यंदा 4.82 लाख हेक्टर  अधिक क्षेत्र लागवडीखाली आहे.

भरड धान्य:

यंदा सुमारे 160.43 लाख हेक्टर क्षेत्रावर भरड धान्याची लागवड करण्यात आली आहे. गेल्या हंगामात हे क्षेत्र 154.77 लाख हेक्टर इतके होते. म्हणजेच, गेल्या वर्षीच्या तुलनेत, यंदा 5.66 लाख हेक्टर  अधिक क्षेत्र लागवडीखाली आहे.

तेलबिया :

यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 181.07 लाख हेक्टर क्षेत्रावर भरड धान्याची लागवड करण्यात आली आहे. गेल्या हंगामात हे क्षेत्र 156.75 लाख हेक्टर इतके होते. म्हणजेच, गेल्या वर्षीच्या तुलनेत, यंदा तब्बल 24.33 लाख हेक्टर  अधिक क्षेत्र लागवडीखाली आहे.

ऊस:

यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 51.95 7 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यात आली आहे. गेल्या हंगामात हे क्षेत्र 51.33 लाख हेक्टर इतके होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत, यंदा 0.62 लाख हेक्टर  अतिरिक्त क्षेत्रात उसाची लागवड क.रण्यात आली आहे

ताग आणि मेस्ता:

यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 6.95 लाख हेक्टर क्षेत्रावर ताग आणि मेस्ता या तंतूमय पिकांची लागवड करण्यात आली आहे. गेल्या हंगामात हे क्षेत्र 6.85 लाख हेक्टर इतके होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत, यंदा 0.10 लाख हेक्टर  अतिरिक्त क्षेत्रात ताग आणि मेस्ताची लागवड करण्यात आली आहे

कापूस:

यंदा सुमारे 123.64 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. गेल्या हंगामात हे क्षेत्र 118.73लाख हेक्टर इतके होते. म्हणजेच, गेल्या वर्षीच्या तुलनेत, यंदा कापसाचे 4.90 लाख हेक्टर अधिक क्षेत्र लागवडीखाली आहे.

6 ऑगस्ट 2020,पर्यंत देशात सरासरी मोसमी पाऊस 505.7 मिलीमीटर इतका झाला आहे. एक जून 2020 ते  6 ऑगस्ट 2020 या कालावधीत अपेक्षित सामान्य पाऊसमान  507.3 मिलीमीटर इतके होते. केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 123 जलाशयांमध्ये  गेल्या वर्षीच्या तुलनेत 108% टक्के जलसाठा शिल्लक आहे. गत दहा वर्ष्याच्या सरासरीच्या तुलनेत हा जलसाठा 94% टक्के होता.